एसटीच्या धक्‍क्‍याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

ओतूर-नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर मोनिका चौक ओतूर येथे (ता. जुन्नर) दुचाकीला एसटीचा पाठीमागून धक्का लागून एकाचा मृत्यू झाला.
गणेश किसन अहिनवे (वय 39, रा. अमीर घाट, ओतूर, ता. जुन्नर) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हा अपघात गुरुवारी (दि. 25) दुपारी चारच्या सुमारास घडला. या अपघाताबाबत ओतूर पोलीस ठाणे अंमलदार के. एम. साबळे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, कल्याण बाजूकडून ओतूरकडे येत असलेली एसटी (एमएच 14 बीटी) ही कल्याण बाजूकडून ओतूरकडे येत असलेल्या दुचाकीला (एमएच 14 एएक्‍स 842) मोनिका चौक, ओतूर येथे पाठीमागून धडकली. या अपघातात गणेश अहिनवे गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी आळेफाटा येथील खासगी दवाखान्यात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची खबर गणपत श्रीपत अहिनवे (रा. अमीर घाट, ओतूर) यांनी दिली. पुढील तपास ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)