एसटीच्या ताफ्यात 2 हजार शिवशाही बसेस

मुंबई – प्रवाशांना अधिक सुखकर तसेच किफायतशीर दरात प्रवास करता यावा यासाठी तसेच खासगी वाहतुकीकडे गेलेल्या प्रवाशांना पुन्हा एसटीकडे वळविण्यासाठी सर्व सुविधांनीयुक्त, वातानुकुलित आणि आरामदायी अशा 2 हजार शिवशाही बसेस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होत आहेत, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज दिली.

एसटीच्या सेवेत दाखल झालेल्या वातानुकुलित आणि आरामदायी अशा शिवशाही बसची विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनाच्या प्रांगणात पाहणी केली. प्रवाशांच्या सुविधेसाठी एसटीमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमासह शिवशाही बसची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी यावेळी दिली.

या बसेस मुख्यत्वे लांबपल्ला, मध्यम लांबपल्ला व आंतरराज्य मार्गावर चालविण्याचे नियोजन आहे. सध्या मुंबई-रत्नागिरी व पुणे-लातूर या मार्गावर ही बससेवा सुरु करण्यात आली आहे. इतर भागात टप्प्याटप्प्याने या बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत, अशी माहिती रावते यांनी दिली.

या बससाठी प्रतिप्रवासी प्रती किमी साधारण दिड रुपया इतका किफायतशीर दर आहे. बसमध्ये प्रत्येक प्रवाशास स्वतंत्र मोबाईल चार्जर, सीट बेल्ट, पुशबॅक पद्धतीच्या सीटस्‌, दोन एलसीडी टिव्ही अशा सुविधा आहेत. पुर्ण वातानुकुलीत आणि आरामदायी असलेली शिवशाही बस प्रवाशांच्या निश्‍चितच पसंतीस उतरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)