एसटीचे तिकीट १० ते १५ टक्क्यांनी महागण्याची शक्यता

मुंबई: एसटी प्रवाशांना लवकरच भाडेवाढीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. कारण तोटा भरुन काढण्यासाठी महामंडळाने भाडेवाढीच्या हालचाली सुरु केल्या आहेत. सर्व प्रकारच्या एसटी तिकीटांमध्ये १० ते १५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव आहे.

राज्य परिवहन आयोगाच्या मंजुरीनंतर ही भाडेवाढ लागू होणार आहे. इंधनाचे वाढते दर, वेतन करार अशा विविध कारणांमुळे ही भाडेवाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन करार १ मे रोजी होणार असल्याची घोषणा केली. भाडेवाढ झाल्यास प्रवाशांच्या खिशाला भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)