एसजीएस मॉल विरुद्द गुन्हा ; काचेची शीट पडून मुलगी जखमी

एसजीएस मॉल विरुद्द गुन्हा ; काचेची शीट पडून मुलगी जखमी
पुणे,दि.31 – बॅंगच्या ट्रॉलिवर ठेवलेली काचेची शीट पायावर पडून एक लहान मुलगी जखमी झाल्याची घटना एसजीएस मॉलमध्ये घडली. याप्रकरणी एसजीएस मॉलचे मालक, पॅन्टालून स्टोअरचे मॅनेजर आणी चार असीस्टंट मॅनेजर यांच्याविरुध्द बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी अभय त्रिपाठी( रा.लष्कर) हे त्यांच्या पत्नी मुलीसमवेत खरेदीसाठी एसजीएस मॉलमधील पॅन्टालून स्टोअरमध्ये गेले होते. यावेळी तेथील बॅगच्या ट्रॉलिवर ठेवलेली काचेची जाड शीट त्यांच्या मुलीच्या पायावर पडली. यामुळे मुलीच्या पायाला मल्टीपल फ्रॅक्‍चर झाले होते. स्टोअरमधील व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली. यामुळे त्यांच्याविरुध्द तक्रार देण्यात आली आहे. फिर्यादी यांनी मुलीचे उपचार पुर्ण झाल्यावर तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पठाण करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)