पुणे,दि.14- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयातील स्वच्छतागृहात एका तरुणीने जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. या घटनेने मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे. घटनास्थळी तातडीने शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक दाखल झाले. संबंधीत तरुणीला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या संदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार संबंधीत तरुणी सहाच्या सुमारास कार्यालयात दाखल झाली होती. तीची तेथील एका लिपीकासोबत वादावादी झाली. यानंतर तीने तडक स्वच्छतागृह गाठले. तेथे अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. तीच्या किकाळ्यांनी कार्यालयातील सर्व कर्मचारी धावतच घटनास्थळी गेले. तेव्हा ती आगीच्या ज्वाळांनी वेढली गेली होती. कर्मचाऱ्यांनी तातडीने तीला वाचवण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांना व रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. तीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ती 50 टक्के पेक्षा जास्त भाजली आहे. संबंधीत तरुणीचे येथील लिपीकाशी प्रेमसंबंध होते, यातूनच हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)