एसएससी घोटाळ्याची सीबीआयकडून चौकशी सुरू

केंद्राने दिली सर्वोच्च न्यायालयात माहिती
नवी दिल्ली – कर्मचारी निवड आयोग म्हणजेच एसएससी आयोगाच्या परिक्षांमध्ये झालेल्या घोटाळ्याची प्राथमिक चौकशी सीबीआयने सुरू केली आहे अशी माहिती केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात दिली. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका आज एका खंडपीठापुढे सुनावणीसाठी आली त्यावेळी केंद्र सरकारकडून ही माहिती देण्यात आली.

या संबंधात माहिती सादर करण्याचा आदेश गेल्या 12 मार्च रोजी न्यायालयाने दिला होता. त्यानुसार ही माहिती तेथे देण्यात आली आहे. या आयोगाच्या परिक्षांचे पेपर पैसे घेऊन फोडण्यात आले आणि तेथे भ्रष्ट मार्गाने नोकर भरती केली गेली असा आरोप या परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी केला होता व त्यासाठी त्यांनी दिल्लीत मोठे आंदोलनही केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)