एसएनबीपी स्कूलमध्ये मिनी क्रिकेट मैदान

पिंपरी – बॉलिंग मशिनची सुविधा मोठ्या क्रिकेट ऍकॅडमीमध्ये उपलब्ध असते, मात्र आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना ही अद्यावत सुविधा दिली आहे व तोच आमचा संकल्प आहे, असे मत एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डी. के. भोसले यांनी व्यक्‍त केले.

रहाटणी येथील एसएनबीपी इंटरनॅशनल स्कूल येथे मिनी-क्रिकेट मैदानाचे उद्‌घाटन भारतीय क्रिकेट खेळाडू व उप कर्णधार रोहीत शर्मा यांच्या हस्ते गुरूवारी झाले.

रोहीत शर्मा म्हणाला, अद्यावत सुविधा शालेय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असल्याचे बघून मला अतिशय आनंद होत आहे. माझ्या काळात मला विविध मैदानावर जाऊन फलंदाजीचा सराव करावा लागला. बॉलिंग मशिन सारखी सुविधा असल्यामुळे खेळाडूंना विविध गतीने येणाऱ्या चेंडूंचा सराव करता येणार आहे. यामुळे चांगला फलंदाज तयार होण्यास मदत होईल.

डी. के. भासले म्हणाले, एसएनबीपी शाळेने खेळांमध्ये विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे व शाळा विविध कार्यक्रम आयोजित करते. शाळेतील सुविधांचा वापर करून येथेच खेळाडूंचा पाया तयार करता येणार आहे. यातूनच आपल्याला भविष्यातील सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, रोहीत शर्मा किंवा विराट कोहली सारखे खेळाडू मिळणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)