एसईझेडमधून होणाऱ्या निर्यातीत 18 टक्‍के वाढ

नवी दिल्ली -विशेष आर्थिक क्षेत्रातून करण्यात आलेल्या निर्यातीत फेब्रुवारीत गेल्या वर्षाच्या तुलनेत 18 टक्‍क्‍यांनी वाढ नोंदविण्यात आली. फेब्रुवारीमधील निर्यात 22,364 कोटी रुपयांची होती. रसायने, औषधे, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, इंजिनिअरिंग, प्लॅस्टिक, रबर, जवाहिर आणि दागिन्यांच्या निर्यातीमध्ये चांगली वाढ नोंदविण्यात आली. फेबुवारी 2017 मध्ये 18,990 कोटी रुपयांची निर्यात करण्यात आली होती. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते फेबुवारीदरम्यान निर्यातीत 17 टक्‍क्‍यांनी वाढ होत 4.93 लाख कोटी रुपयांवर पोहोचली.

दरम्यान, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत मारुतीने ह्युंदाई, फोक्‍सवॅगन आणि जनरल मोटर्स या कंपन्यांना स्पर्धेत मागे टाकत बाजी मारली आहे. एप्रिल ते सप्टेंबर 2017 या काळात मारुती सुझुकीने 57,300 कारची निर्यात केली आहे. मागील वर्षी याच काळात मारुतीने 54,008 कारची निर्यात केली होती. मारुतीच्या निर्यातीत मागच्या वर्षाच्या तुलनेत जवळपास 6 टक्‍के वाढ झालेली आहे.

आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत मारुतीने चांगलीच आघाडी घेतली आहे. कार निर्यातीत ह्युंदाई मोटर्स गेली काही वर्षे सातत्याने आघाडीवर होती. परंतु, चालू आर्थिक वर्षात ह्युंदाईने 44,585 कार्सची निर्यात केली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही जवळपास 29.25 टक्‍क्‍यांची घसरण आहे. त्यामुळेच ह्युंदाई मोटर्सची पीछेहाट होत ती फोक्‍सवॅगन आणि जनरल मोटर्स नंतर चौथ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. सर्व कंपन्या निर्यात वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)