एसआयपीमुळे किरकोळ गुंतवणूकदारांकडून म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत वाढ

नवी दिल्ली: म्युच्युअल फंडमध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीमध्ये वाढ नोंदविण्यात येत आहे. जुलै महिन्यात एसआयपीच्या माध्यमातून किरकोळ गुंतवणूकदारांकडून करण्यात येणारी गुंतवणूक 7,554 कोटी रुपयांवर पोहोचले. गेल्या वर्षाच्या जुलैच्या तुलनेत त्यात 53 टक्‍क्‍यांनी वाढ नोंदविण्यात आली. एसआयपीच्या माध्यमातून 2017-18 मध्ये 67 हजार कोटी रुपये, तर 2016-17 मध्ये 43,900 कोटी रुपयांची गुंतवणूक झाले होती. एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास धोक्‍याचे प्रमाण कमी असते. स्थावर मालमत्ता आणि सोने यासारख्या पारंपरिक क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे प्रमाण घटत आहे, यामुळे म्युच्युअल फंडकडे ओघ सध्या वाढत आहे. चालू आर्थिक वर्षात जुलैपर्यंत म्युच्युअल फंडमध्ये 29,102 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आलेली आहे. म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्यांची खाती 2.33 कोटी आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या प्रत्येक महिन्यात सरासरी 9.92 लाख खाती नव्याने जोडली गेली आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)