मुंबई -एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर तातडीने नवीन पूल उभारण्याचं काम लष्कराकडून सुरू आहे. या पादचारी पुलासाठी मध्य रेल्वेवर एक दिवसाचा आणि पश्चिम रेल्वेवर तीन दिवसांचा ब्लाॅक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेवर एक दिवसाचा तर पश्चिम रेल्वेवर सोमवार पर्यंत मेगा ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वे मार्गावरील एल्फिन्स्टन रोड स्थानकात नव्याने उभारण्यात येणाऱ्या पादचारी पुलाचे काम भारतीय लष्करामार्फत सुरू आहे. या पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वे तसेच पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0