एल्गार परिषद आणि माओवादी प्रकरण : तपास करून दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांना 90 दिवसांची मुदत वाढ

पुणे- बंदी घातलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या कारणावरून अटक केलेल्या पाच जणांच्या विरोधात तपास करून दोषारोपपत्र दाखल करण्यास पोलिसांना 90 दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. सत्र न्यायाधीश के. डी. वडणे यांनी यासंबंधी आदेश दिला आहे.
सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत, रोना विल्सन अशी त्या पाच जणांची नावे आहेत. या पाच जणांना अटक करून सोमवारी (दि. सप्टेंबर) 90 दिवस पूर्ण होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर सर्वजण सीपीआय या बंदी घातलेल्या संघटनेचे सक्रीय सदस्य असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून कागदपत्रे, पेन ड्राईव्ह, सीडी, डीव्हीडी, हार्ड डिक्‍स, सिम कार्ड आणि इतर इलेक्‍ट्रॉनिक वस्तु जप्त करण्यात आल्या आहेत. त्या तपासासाठी मुंबई फॉरेंसिक लॅबकडे तपासासाठी पाठवल्या आहेत. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही, या इतर तपासासाठी 90 दिवस वाढ देण्याचा अर्ज पोलिसांनी केला होता. यावर युक्तीवाद करताना जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार म्हणाल्या, शहरी नक्षलवाद हा जंगलातील नक्षलीपेक्षा गंभीर, व्यापक स्वरूपाचा आहे. आधीचे पाच आरोपी आणि नुकतेच अटक करण्यात आलेले तीन अशा एकूण आठ आरोपींकडून ताब्यात घेण्यात आलेला डेटा हा मोठ्या प्रमाणात असून त्या त्याचे विश्‍लेषण करण्याचे काम सुरू आहे. त्यातील काही इलेक्‍ट्रॉनिक डिव्हाईसची क्‍लोन कॉफी देखील प्राप्त झाली आहे. आरोपींचे बॅंक खाते तपासण्यात येत असून त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. त्यातुन पुरावा गोळा करण्याचे काम सुरू आहे.
तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार म्हणाले, बंदी घातलेल्या संघटनेमध्ये देशातील काही नामांकित संस्थेतील विद्यार्थी सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यांना नेमके कोणी सहभागी केले, त्यांना कुठल्या ठिकाणी पाठवण्यात आले आहे, याचा तपास करायचा आहे. एल्गार परिषदेसाठी आलेले पाच लाख रुपये कशा प्रकारे खर्च झाले, कोणी खर्च केले याचा तपास करायचा आहे. पत्रांमध्ये उल्लेख असणारी शस्त्रे कोणी खरेदी केली, ती कोठून आणण्यात आली, त्यांचा वापर कुठे होणार होता, पैसे कोणी पुरवले आदी बाबी तपासयच्या आहेत. दरम्यान बचाव पक्षाच्या वतीने ऍड. रोहन नहार, ऍड. सिद्धार्थ पाटील आणि ऍड. राहुल देशमुख यांनी काम पाहिले. 3 सप्टेंबर रोजी नव्हे, तर 4 सप्टेंबर रोजी 90 दिवस पूर्ण होत आहेत. त्यामुळे आणखी दोन दिवसाचा कालावधी शिल्लक असल्याने ऍफेडेव्हिट करण्यसाठी वेळ द्यावा, अशी मागणी बचाव पक्षातर्फे करण्यात आली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)