एलसीबीचे पद्माकर घनवट यांची पुण्याला बदली

सातारा,दि.1(प्रतिनिधी)
सातारा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाचे पो.नि पद्माकर घनवट यांची बदली झाली. ते लवकरच पुणे ग्रामीण पोलिस दलात रुजु होणार आहेत. त्यांच्या जागी पो.नि. विजय कुंभार,प्रमोद जाधव या अधिकाऱ्यांची वर्णी लागण्याची शक्‍यता आहे.

पद्माकर घनवट यांनी गेली चार वर्षे सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात उल्लेखनिय कामगिरी केली आहे.घनवट यांच्या बदलीचा आदेश बुधवारी रात्री निघाला. त्यांची पुणे ग्रामीण येथे तर पुणे ग्रामीणचे संतोष गिरीगोसावी यांची सोलापूर ग्रामीण,सोलापूरचे विजय कुंभार यांची साताऱ्याला बदली झाल्याचे पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी आदेशात नमुद केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अत्यंत शांत स्वभावाच्या पद्माकर घनवट यांनी साताऱ्याच्या गुन्हेगारी जगतावर आदरयुक्त दबदबा निर्माण केला होता. अवैध पिस्टल बाळगणारे,भुरटे चोर, तथाकथित दादा,बनावट नोटा बनवणारे रॅकेट,पसरणीच्या घाटातील खुन यासारखे अनेक गंभीर व क्‍लिष्ट गुन्हे घनवट यांनी सहज उघड केले. सातारा शहरात दोन हजाराच्या नव्या नोटा विकण्यासाठी आलेल्या कोल्हपुरातील रॅकेटचा पर्दाफाश त्यांनी केला होता.दोन हजाराच्या एक कोटी किमंतीच्या नोटा त्यांनी पकडल्या होत्या. साताऱ्यातील त्यांच्या कार्यकाळाला याच कामगिरीने चार चांद लावले होते.

घनवट यांनी स्थानिक गुन्हे शाखा एका वेगळ्या उंचीवर पोहचवली आहे . त्यामुळे तेवढ्याच ताकदीचा नवा अधिकारी देण्याचे आवाहन वरिष्ठांपुढे आहे. घनवट यांच्या जागी
जिल्ह्यात यापूर्वी काम केलेल्या प्रमोद जाधव , आण्णासाहेब घोलप यांच्या नावाची मोठी चर्चा पोलिस दलात सुरू आहे.तसेच सोलापूरहून आलेले पोनि विजय कुंभार यांचीही वर्णी लागू शकते . घोलप यांनी यापूर्वी सातारा शहर पोलीस ठाण्यात 2 वर्षे व फलटण शहर पोलीस ठाण्यात 2वर्षे तर प्रमोद जाधव यांनी वडूज,कराड शहर अशी जिल्ह्यात 4वर्षे सेवा केलेली आहे. त्यामुळे नेमकी कोणाची नेमणुक होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

… मिले सुर तुम्हारा
पद्माकर घनवट यांचा व पुणे ग्रामीणचे एसपी संदीप पाटील यांचा स्नेह आहे. जिल्ह्यात कोणत्याही विषयावर काम करताना त्यांच्यात तात्काळ एकमत व्हायचे. त्यामुळे घनवट यांना पुण्यात पुन्हा एलसीबीच मिळणार अन संदीप पाटील यांच्या सोबतचा सुर पुन्हा जुळणार. असे पोलिस दलात बोलले जात आहे.

नो पॉलिटिक्‍स
घनवट यांची बदली झाल्याचे कळताच आपल्याला त्या जागी संधी मिळावी म्हणुन अनेकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांचा मुड पाहता सध्या तरी नो पॉलिटिक्‍स असेच बोलले जात आहे.

पद्माकर घनवट लवकरच डीवायएसपी
पो.नि घनवट हे 1992 च्या उपनिरीक्षक बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी या आगोदर जिल्ह्यात पोलिस उपनिरीक्षक, सहाय्यक निरीक्षक म्हणुन काम केले आहे. पुणे ग्रामीणला बदली झाल्यानंतर ते लवकरच उपअधीक्षक म्हणुन रुजु होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)