एलबीएसमध्ये आज रोजगार मेळावा

सातारा – येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित लालबहाद्दूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स ऍण्ड कॉमर्समध्ये नगरपरिषद प्रशासन संचनालय व सातारा नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार दि.10 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांचे जन्मशताब्दी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ.आर.व्ही.शेजवळ यांनी दिली. महाविद्यालय ज्ञानदानाबरोबरच विद्यार्थ्यांच्या हाताला काम देत उदरनिर्वाहाचा प्रश्‍न सोडवत असते. त्यामुळे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त बेरोजगारांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शेजवळ यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)