कोलंबो – एलटीटीई संघटनेच्या प्रभावाखाली असलेल्या श्रीलंकेतील मन्नार भागात नवीन इमारतीसाठी पायाखोदत असताना तेथे 38 सांगाडे सापडले आहेत. श्रीलंका लष्कर आणि एलटीटीई या तामिळी गनिमी संघटनेमध्ये 2009 मध्ये झालेल्या संघर्षाच्यावेळी श्रीलंका लष्कराकडून हत्या करण्यात आलेल्या गनिमांचा हे सांगाडे आहेत असे सांगितले जात आहे. तेथेच त्यांना गाडून टाकण्यात आले असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणाची तेथे आता चौकशी सुरू करण्यात आली असून इमारतीचे बांधकाम होणारा भाग आता चारही बाजूने बंदिस्त करण्यात आला आहे तेथे कोणालाहीं जाण्यास अनुमती नाकारण्यात आली आहे. हे सांगाडे मन्नार हॉस्पीटल मध्ये नेण्यात आले असून तेथे त्यांची डीएनए चाचणी केली जाणार आहे. 1983 ते 2009 या काळात हे गाव तामिळी गनिमांच्या ताब्यात होते.

तथापी श्रीलंका सरकारने निर्घृण लष्करी कारवाई करून एलटीटीईचा निपा:त केला. त्यावेळी झालेल्या कारवाईच्यावेळी किमान चाळीस हजार तामिळींचा खात्मा करण्यात आला असावा असा मानवाधिकार कार्यकर्त्यांचा दावा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)