“एलओसी’वरील व्यापारावर “एनआयए’ची नजर

नवी दिल्ली- “एलओसी’वर नजर ठेवण्यासाठी एनआयए”कडून आता कर अधिकाऱ्यांची मदत घेतली जाणार आहे. जम्मू काश्‍मीरमधील विभाजनवाद्यांकडून “एलओसी’पलिकडील व्यवहारातून मोठी माया मिळवली जात असावी आणि या निधीचा उपयोग दहशतवादी कारवायांमध्ये केला जात असल्याच्या संशयावरून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

“एलओसी’ पलिकडील व्यापारी व्यवहारांची तपासणी करण्यासाठी “एनआयए’मध्ये महसूल सेवेतील उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सामावून घेण्यास केंद्राने परवानगी दिली आहे.

“एनआयए’ने डिसेंबर महिन्यात बारामुल्ला आणि पूंछ जिल्ह्यात दहशतवादाच्या एका प्रकरणामध्ये वस्तूंच्या देवघेव (बार्टर) पद्धतीच्या आधारे काही व्यवहार होत असल्याची “एफआयआर’ दाखल केली होती. बेनामी मालमत्ता आणि काही विभाजनवाद्यांच्या आर्थिक व्यवहारांचीही हे अधिकारी तपासणी करणार आहेत. अर्थमंत्रालयाकडून या अधिकाऱ्यांना चार महिन्यांसाठी “एनआयए’बरोबर कामात लक्ष घालण्यास सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)