श्रीनगर – जम्मू काश्‍मीरमधील तंगधार आणि नौगाम या दोन ठिकाणी “एलओसी’वरून घुसखोरी करण्याचे डाव सुरक्षा रक्षकांनी उधळून लावले आहेत. कुपवाडा जिल्ह्यातील या दोन्ही ठिकाणी शनिवार संध्याकाळपासून झालेल्या चकमकीमध्ये एकूण 4 दहशतवादी मारले गेले आहेत.

घुसखोरी करण्याच्या प्रयत्नातील दहशतवाद्यांना सुरक्षा रक्षकांनी हेरल्यावर चकमक झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शनिवारी संध्याकाळी तंगधार भागात झालेल्या चकमकीमध्ये तीन दहशतवादी मारले गेले. या ठिकाणी भारतीय लष्कर आणि पाकिस्तानी सैनिकांमध्ये जोरदार धुमश्‍चक्री सुरू असल्याचे जम्मू काश्‍मिरचे पोलिस महासंचालक एस.पी.वेद यांनी सांगितले. एका अन्य घटनेमध्ये नौगाम भागात कस्तुरी नुल्ला जवळ एक घुसखोर सुरक्षा रक्षकांच्या गोळीबारामध्ये मारला गेला. याठिकाणीही सुरक्षा रक्षकांकडून कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले.

गेल्या आठवड्यात “एलओसी’वरून घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांच्या गोळीबारामध्ये चार जवान जखमी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)