‘एलईडी’ प्रकरण पेटणार

श्‍वेतपत्रिका काढा : मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप

खासदार वंदना चव्हाण यांची मागणी : कॅगने ठपका ठेवल्याचे वृत्त दै.”प्रभात’ने केले होते प्रसिद्ध

पुणे – महापालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या एलईडी फिटींग्ज प्रकल्प अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. राज्याच्या लोकलेखा समिती (कॅग)ने ठपका ठेवला असल्याने या प्रकरणी मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी खासदार अॅॅड. वंदना चव्हाण यांनी केली आहे. याबाबतचे पत्र महापालिका आयुक्त सौरभ राव यांना देण्यात येणार असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या प्रकल्पावर कॅगने ठपका ठेवल्याचे वृत्त दैनिक “प्रभात’ने 18 ऑगस्ट दिले होते.

वीज बचतीसाठी शहरात सर्व पथदिव्यांना एलईडी फिटींग्ज बसविण्याचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. त्याचे काम कोणत्याही निविदा न काढता थेट टाटा प्रोजेक्‍टस्‌ या कंपनीस देण्यात आले आहे. एलईडी फिटींग्जनंतर वीज बचत होईल. त्यातील 98.5 टक्के या कंपनीस तर 1.5 टक्के निधी महापालिकेस मिळणार, अशा करारावर हे काम देण्यात आले आहे. कंपनीने गेल्या दीड वर्षांत शहरात जवळपास 86 हजार फिटींग्ज बसविली आहे. तर, बचत झालेल्या वीज बिलापोटी कंपनीस 12 कोटींचा निधी मिळालेला आहे. मात्र, या प्रकल्पांबाबत नगरसेवकांच्या तक्रारी आहेत. अनेक ठिकाणी फिटींग्ज बसविल्या नाहीत. बसविलेल्या फिटिंग्ज बंद आहेत. ज्या कंपनीला हे काम दिले, त्यांना बिल न देता ते इतर कंपनीला दिल्याच्या तक्रारीही नगरसेवकांनी मागील महिन्यात मुख्यसभेत केल्या होत्या. त्यानंतर आयुक्तांनी या कामाच्या निविदांची चौकशी करण्याचे आणि “थर्ड पार्टी ऑडिट’चे आदेश दिले होते. हे ऑडिट सुरू असतानाच आता “कॅग’नेही या योजनेतील त्रुटींवर बोट ठेवले आहे. कॅगच्या आक्षेपामुळे या खरेदी प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट होत आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर आयुक्तांनी या प्रकरणी श्‍वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी खासदार चव्हाण यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)