एलईडी’च्या प्रस्तावाला “कात्रजचा घाट’

पिंपरी- केंद्र सरकारच्या ईईएसएल कंपनीकडून शहरात 36 हजार एलईडी दिवे बसविण्याच्या प्रस्ताव महासभेने फेटाळून लावला. त्याकरिता सत्ताधारी भाजप व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची अभूतपूर्व एकजूट सभागृहात पहायला मिळाली. प्रशासनाने मांडलेल्या विषय फेटाळताना नगरसेवकांनी अगदी शेलक्‍या शब्दांत प्रशासनाचे कान उपटले. सभागृहाने हा विषय फेटाळला असून पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहती मधील एलईडी निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून हे काम करून घेण्याचे या सभेत सुचविले आहे.

गुरुवारी महापालिकेची नोव्हेंबर महिन्याची तहकूब सभा गुरुवारी (दि. 20) पार पडली. शिवसेनेचे नीलेश बारणे यांनी या विषयावरील चर्चेला सुरुवात केली. शहरातील 36 हजार एलएडी दिवे बसविण्यासाठी बाजारभावानुसार महापालिकेचा 15 कोटी खर्च होत असताना या कंपनीला दरवर्षी एलईडी बसविण्याच्या मोबदल्यात 10 कोटीप्रमाणे सात वर्षांत 70 कोटी देणार आहोत. औद्योगिक वसाहतींमधील अनेक कंपन्या हे काम कमी खर्चात करू शकतील, ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर भाजपच्या आशा शेडगे यांनी प्रशासनाला कोंडीत पकडले. या कंपनीच्या समजुतीच्या करारनाम्यात याच कंपनीकडून हे दिवे बसविण्याचे बंधनकारक नसल्याचे नमूद केले आहे. ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून देत, अशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिकेचा याच कंपनीकडून काम करुन घेण्यासाठ अट्टाहास का आहे? असा सावाल उपस्थित केला. या कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर विक्री पश्‍चात सेवा उपलब्ध होणार आहे. मात्र, प्रशासन हा विषय का लादून, केंद्र सरकारची बदमानी करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरातील विविध केवळ 30 टक्के ठिकाणी एलईडी बसविण्याचे काम बाकी आहे. मात्र, हा वाढीव खर्च करत असताना आपण या महापालिकेचे विश्‍वस्त आहोत, याचे तरी भान ठेवा, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या डॉ. वैशाली घोडेकर यांनी आपला त्रागा व्यक्त केला. तर महापालिकेला आर्थिक दिवाळखोरीत काढण्यासाठी प्रशासनाचे काम सुरु असल्याचा आरोप भाजपच्या संदीप वाघेरे यांनी केला. हे होत असताना आम्ही बघ्याची भुमिका घेणार नसून, याविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला. भाजपच्या तुषार कामठे यांनी तर प्रशासन महापालिकेला लुटण्याची एकही संधी सोडत नसल्याबद्दल आयुक्त हर्डीकर यांचे अभिनंदन केले. मला पक्षाची भुमिका माहित नाही. मात्र, ही लूट रोखण्यासाठी मी शहरातल करदात्या नागरिकांसोबत आहे, अशी भुमिका मांडली. तर या कंपनीचे नांदेडमधील काम अर्ध्यावरच बंद करण्यात आले असल्याची माहिती नीता पाडळे यांनी सभागृहात दिली.

शत्रुघ्न काटे यांनी राष्ट्रवादीच्या काळातील टी-5 या लाईट फिटींगचा संदर्भ देत राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. या विषयात कोनालाही स्वास्य नसून, तो फेटाळून लावण्याची मागणी केली. तर आतापर्यंत हा विषय चार वेळा तहकूब करुनही वारंवार विषय पत्रिकेत का येत आहे, असा प्रश्‍न शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी उपस्थित केला. केंद्र व राज्य सरकारच्या नावावर प्रशासन बीले फाडत असल्याचा आरोप करत, विद्युत विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण तुपे हे एवढ्या दिवस काय राज्य सरकारच्या अध्यादेशाची वाट पाहत होते का? अशी आयुक्‍त हर्डीकर यांना विचारणा केली.
सभागृह नेते एकनाथ पवार यांनी देखील टी-5 या लाईट फिटिंगचा संदर्भ दिला. शहरात नव्याने एलईडी बसविण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगत एखाद्या भाजप नगरसेवकाने विषयाला विरोध केल्यास विरोधकांना आनंदाच्या उकळ्या फुटतात. मात्र, ही कंपनी केंद्र सरकारची असून, त्यामध्ये आमचे स्वारस्य नसल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी, शिवसेनेची मतदानाची मागणी
अवास्तव खर्चामुळे हा विषय फेटाळून लावण्यासाठी भाजपसह सर्वच पक्षांचे नगरसेवक आग्रही होते. मात्र, हा विषय मंजूर होऊ शकतो, अशी राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नगरसेवकांना भीती होती. त्यामुळे हा विषय मंजूर करायचा असल्यास मतदान घेण्याची मागणी राष्ट्रवादीच्या मंगला कदम आणि शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केली. त्यामुळे केवळ वर-वर विरोध करणारे छुपे पाठीराखे समोर येतील, अशी भूमिका घेतली. मात्र, हा विषय फेटाळून लावल्याने मतदान घेण्याची गरज भासली नाही.

“सेटींग’साठी आयुक्‍तांना “ऍन्टी चेंबर’!
विरोधी पक्षनेते दत्ता साने हे या विषयावर सभागृहात बोलत असताना सभागृह नेते एकनाथ पवार आणि नगरसेवक विलास मडिगेरी हे सभागृहासमोर आयुक्त हर्डीकर यांच्या कानात कुजबूज करीत काहीतरी सांगत असल्याने साने प्रचंड संतापले. या विषयाला आमचा तीव्र विरोध असून, आयुक्तांना “सेटींग’ करायला “ऍन्टी चेंबर’ असल्याचे भर सभेतच सुनावले. तसेच या विषयामुळे किमान भाजप नगरसेवकांना कुठे पाणी मुरतंय, हे समजल्याने त्यांचे अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)