एलआयसी हाउसिंग फायनान्सकडून 22 लाख कुटुंबांना कर्जपुरवठा

मुंबई, दि. 20 – गेल्या 28 वर्षांत एलआयसी हाउसिंग फायनान्सच्या विविध उत्पादनांचा 22 लाखांपेक्षा जास्त कुटुंबियांना फायदा झाला आहे. एलआयसी एचएफएलने आतापर्यंत भारतातील आपल्या 250 कार्यालयांद्वारे 2.42 लाख कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे.

एलआयसी हाउसिंग फायनान्सने नागरीकांना त्यांचे स्वतःचे घर घेण्यासाठी मदत करत व्यावसायिक कारकीर्दीची 28 वर्ष पूर्ण केली. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनय साह म्हणाले, की एलआयसी एचएफएल सरकारच्या 2022 पर्यंत सर्वांसाठी घर या धोरणाला पाठिंबा देण्यासाठी बांधील असून त्यासाठी परवडणाऱ्या गृहक्षेत्रावर जास्त भर दिला जाणार आहे. या क्षेत्रातील खरेदीदारांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या प्रकल्पांनुसार विपणन धोरण तयार करण्यात येईल. कंपनीने परवडणाऱ्या गृहक्षेत्रातील हिस्सा वाढवण्याच्या हेतूने नुकतीच काही उत्पादने लॉंच केली आहेत.

कंपनीकडे भारतातील सर्वात विस्तृत विपणन जाळे असून तिचे नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय मुंबईत आहे. यावर्षी पटना आणि भोपाळमध्ये दोन नवी प्रादेशिक कार्यालये सुरू केल्यानंतर कंपनीकडे सध्या भारतात नऊ प्रादेशिक कार्यालये, 22 बॅक ऑफिसेस, 250 मार्केटिंग युनिट्‌स, तर दुबई आणि कुवैत येथे मिळून दोन परदेशी कार्यालये आहेत. कंपनीने गृह कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी व त्यांना कर्ज प्रक्रियेत मदत करण्यासाठी 11 हजार मध्यस्थांचे जाळे तयार केले आहे.

एलआयसी हाउसिंग फायनान्ससाठी हा अभिमानाचा क्षण आहे. आमचे ग्राहक, गुंतवणूकदार आणि भागधारक ही आमची मूलभूत ताकद आहे. आमची कामगिरी, एकाच ध्येयाने प्रेरित होऊन अथक मेहनतीस एकत्रितपणे काम करणाऱ्या टीममुळे साध्य झाली आहे.

व्यवसायाच्या सर्व विभागांमध्ये विकास आणि सुधारणा घडवून आणण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न यापुढेही सुरू राहाणार असून आता विविध भागधारकांच्या मदतीने आमचेच विक्रम मागे टाकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आमच्यासाठी हा अविरत प्रवास आहे आणि वाढत्या ग्राहकवर्गाला सेवा देत व्यवसाय पुढील पातळीवर नेण्यासाठी आम्ही बांधील आहोत. कंपनीने येत्या काही वर्षांत दोन लाख कोटी रुपयांचा कर्ज पोर्टफोलिओ पार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)