एलआयसीच्या गुणवंत प्रतिनिधींचा सन्मान

केडगाव- एलआयसीतील गुणवान प्रतिनिधींचा वाखारी (ता. दौंड) येथे एलआयसीचे शाखाअधिकारी गजानन कोषटवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एलआयसीच्या सहा प्रतिनिधींनी विशेष कामगीरी करीत एमडीआरटीचा बहुमान संपादित केला असून, शाखेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये ज्ञानेश्वर मुळे, दीपक ताकवने, रमेश वत्रे, सुनीता कदम, युवराज शिंगटे आणि अविनाश जोशी यांचा समावेश आहे. या सहा प्रतिनिधींची अमेरिकेत होणाऱ्या विमा परिषदेसाठी निवड झाली आहे. या कार्यक्रमाचे आयोजन विकास अधिकारी किरण लाटकर यांनी केले होते. दौंड शाखेच्या पहिल्या महिला विमा एमडीआरटी होण्याचा मान मिळवलेल्या सुनीता कदम यांचा शाखेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. विकास अधिकारी किरण लाटकर म्हणाले की, दौंड शाखेच्या प्रतिनिधींनी पुणे विभागात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विमा प्रतिनिधी आणि पत्रकार रमेश वत्रे यांनी, तर आभार नीलेश पाठक यांनी मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)