एलआयसीचा विमा व्यवसायात सिंहाचा वाटा 

पुणे: भारतातील आयुर्विमा महामंडळाने म्हणजे एलआयसीने आपल्या सेवेची 62 वर्षे नुकतीच साजरी केली. 1956 मध्ये एलआयसीने 5 कोटी रुपयांचे भागभांडवल आणि 352 कोटी रुपयांच्या मालमत्तेसह आपल्या कामाची सुरुवात केली. आता या महामंडळाची मालमत्ता 2584484 कोटी रुपयांवर गेली आहे. तर लाईफ फंड 2584484 कोटींचा आहे. तर मालमत्ताचे मूल्य 28.45 लाख कोटी रुपयांहून अधिक आहे.
कार्यालयाची संख्या 168 वरून आता 4826 वर गेली आहे. आता महामंडळात 1.11 लाख कर्मचारी 11.48 लाख विमा प्रतिनिधी आहेत. तर पॉलिसींची संख्या 29 कोटींवर गेली आहे. 2017-18 या आर्थिक वर्षात एलआयसीकडे विविध स्तरातील वैयक्‍तिक विमा ग्राहकांसाठी 30 उत्पादने होती. यात हयातीचा विमा बालकांसाठी विमा, पेन्शन योजना यांचा समावेश आहे.
2017-18 या आर्थिक वर्षात एलआयसीने 21 दशलक्षहून अधिक पॉलिसी विकल्या तर प्रथम वर्ष विमा हप्त्यात 8.12 टक्‍के वाढ झाली आहे. प्रथम वर्ष विमा हप्त्यापोटी 30 मार्च 2018 अखेर 134551 कोटी रुपये जमा झाले आहेत. एलआयसीचा विमा व्यवसायातील हिस्सा 69.40 टक्‍के आहे. तर पॉलिसीची संख्या एकूण संख्येच्या 75.67 टक्‍के इतकी आहे.
एलआयसीने 2017-18 या वर्षात 266.08 लाख विमा दावे दिले. त्याची एकूण रक्कम तब्बल 111860 कोटी रुपयांवर आहे. एलआयसीने अधिकाधिक ऑनलाइन सुविधा देण्यासाठी पार्टलमध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत. अँड्रॉईड आणि आयओएसवर चालणारे मोबाइल ऍप 80 हजारांहून अधिक ग्राहक वापरतात. नवीन कस्टमर पोर्टलचा लाभ 10 लाखांहून अधिक ग्राहक घेतात.
एलआयसी सामाजिक सुरक्षा योजनेच्या माध्यमातून गरीब लोकांना सवलतीच्या दरात समूह विम्याद्वारा विमा संरक्षण देते. 2006 मध्ये सामाजिक जबाबदारी म्हणून एलआयसीने गोल्डन ज्युबिली फंडाची स्थापना केली. एलआयसी आता विविध 14 देशांत काम करीत आहे. एलआयसीला महत्त्वाची 27 पारितोषीके मिळाली आहेत. एलआयसीची 2736782 कोटी रुपयाची गुंतवणूक आहे. देशाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमात एलआयसी पुढे असते. तरुणांना आकर्षित करण्यासाठी एलआयसीचा प्रयत्न आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)