एलआयसीचा विमा बाजारपेठेतील टक्‍का घसरला

नवी दिल्ली -सार्वजनिक क्षेत्रातील बलाढ्य विमा कंपनी एलआयसीचा एकूण विमा बाजारपेठेतील हिस्सा कमी होऊ लागला आहे. 2017-18 या वर्षात एलआयसीचा विमा बाजारातील हिस्सा 2 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 44 टक्‍के झाला आहे. तर खासगी कंपन्या हिस्सा 2 टक्‍क्‍यांनी वाढून 56 टक्‍के झाला आहे. त्यामुळे एलआयसीला आता गेलेला हिस्सा मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

सरलेल्या वर्षात घडलेली आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आतापर्यंत जीवन विमा क्षेत्रात आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ आघाडीवर होती. आता एसबीआय लाईफने बाजी मारली आहे.

आता जीवन विमा क्षेत्रात जवळ जवळ दोन डझन कंपन्या आहेत. मात्र खासगी कंपन्यांच्या एकूण बाजार हिश्‍श्‍यात मोठ्या तीन कंपन्यांचा हिस्सा 57 टक्के इतका आहे. त्यात एसबीआय लाईफ, आयसीआयसीआय प्रु व एचडीएफसी लाईफचा समावेश आहे. या तीन कंपन्यांचा बाजारातील हिस्सा 2009 मध्ये केवळ 39 टक्‍के होता.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एलआयसीची निर्मिती झाली होती. बरीच दशके एलआयसीची विमा क्षेत्रात मक्तेदारी होती. 1991 ला आर्थिक सुधारणा सुरू झाल्यानंतर खासगी क्षेत्रातील कंपन्यांना हा व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्याचा परिणाम आता जाणवू लागला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)