“एलआयसी’चा बळी का दिला जातोय?

आयडीबीआय’ला वाचविण्याचा प्रयत्न : विरोध करण्याचा इशारा

पुणे- तोट्यात असलेल्या “आयडीबीआय’ बॅंकेतील सरकारी हिस्सा विकण्याच्या हालचाली केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू झालेल्या आहेत. हा हिस्सा विकत घेण्यासाठी केंद्र सरकारने “एलआयसी’ला (भारयीय आयुर्विमा महामंडळ) पुढे केले आहे. सुमारे 40 टक्के हिस्सा विकून केंद्र सरकारला सुमारे 10 ते 11 हजार कोटी रुपये मिळणार आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर अडचणीत असलेल्या आयडीबीआय बॅंकेला वाचविण्यासाठी सुस्थितीत असलेल्या “एलआयसी’चा बळी का दिला जात आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आयडीबीआय ही सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक आहे. 31 मार्च 2018 पर्यंत बुडीत कर्जाचे प्रमाण हे 28 टक्के होते. त्यामुळे चांगली कामगिरी करण्यास अपयशी ठरलेल्या आयडीबीआय बॅंक घेण्यास “एलआयसी’ला भाग पाडले जात असल्याचा आरोप होत आहे. “एलआयसी’चे सुमारे 38 कोटी पॉलिसीधारक आहे. एका बाजूला पैसे सुरक्षित रहावे, भविष्यकाळात तरतूद असावी म्हणून नागरिक एलआयसीमध्ये पैसे गुंतवत आहे. नागरिकांचा एलआयसीवर विश्‍वास आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची संख्याही मोठी आहे. आर्थिक दृष्टया सक्षम असताना “एलआयसी’ला तोट्यात असलेली आयडीबीआय बॅंक घेण्यास हा पुढे केले जात आहे, याचे मात्र कोडे उलगडत नाही.

आयडीबीआयमध्ये केंद्र सरकारचा सुमारे 81 टक्के हिस्सा आहे. तो 50 टक्‍क्‍यांपर्यंत कमी करण्याचा सरकारचा विचार आहे. यातील 40 टक्के हिस्सा केंद्र सरकारकडून विकला जाणार आहे. यातून सुमारे 10 ते 11 हजार कोटी रुपये केंद्र सरकारला मिळण्याची शक्‍यता आहे.
आयडीबीआयचे थकीत असलेले कर्ज वसूल करण्यासाठी सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात नाही. कर्ज बुडव्या लोकांकडून पैसे वसूल करायचे सोडून सरकार थेट एलआयसीलाच आयडीबीआय बॅंकेतील हिस्सा घेण्यास आणले जात आहे.

आयडीबीआय बॅंकेने चुकीच्या पद्धतीने कर्ज दिलेली आहेत. या कर्जाची वसुली करण्यास आयडीबीआय बॅंक अपयशी ठरली आहे. त्यामुळे आयडीबीआय बॅंकेला वाचविण्यासाठी “एलआयसी’ला पुढे केले जात आहे. “एलआयसी’ फायद्यामध्ये आहे. मग, तोट्यात असलेली बॅंक घेण्यास का भाग पाडले जात आहे? याला विरोध करण्यात येणार आहे. केंद्र सरकार हा नवीन पायंडा पाडत आहे.
– मिहिर थत्ते, पुणेकर नागरी कृती समिती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)