एम. करुणानिधी अनंतात विलीन

चेन्नई – तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख मुथुवेल करुणानिधी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी, त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पहाटे चेन्नईतील राजाजी हॉलमध्ये आणण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची रीघ लागली होती. द्रमुकचे राज्यभरातील कार्यकर्ते आपल्या लाडक्‍या नेत्याला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने चेन्नईत जमले होते.

शोकाकुल अवस्थेतील हजारो समर्थकांनी हॉलबाहेर रांगा लावून त्यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. याआधी अभिनेता रजनीकांत, कमल हसन यांनी देखील अंत्यदर्शन घेतले होते. सांयकाळी करूणानिधींवर मरिना बीचवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हजारोंच्या संख्येने जनसमुदाय येथे लोटला होता. याप्रसंगी पार्थिवाचे अंत्यदर्शनासाठी आलेले जमावामध्ये चेंगराचेंगरी होऊन 2 जण ठार, तर 30 जण जखमी झाले. ही घटना सकाळी 11 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास घडली. पोलिसांनी थोड्या-थोड्या लोकांचे गट बनवून त्यांना अंत्यदर्शनासाठी पाठवायला सुरुवात केली तेव्हा ही घटना घडली. अचानक गर्दीचा लोंढा आल्याने अनेक जण धडपडले. एकमेकांवर पडल्याने लोक जखमी झाले.

जखमींना राजीव गांधी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे गंभीर जखमी असलेल्या दोघांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. यापैकी एक पुरुष, तर एक महिला आहे. शेनबागम (60) अशी महिलेची ओळख पटली असून ती एमजीआर नगरमधील रहिवासी आहे. मात्र, पुरुषाची ओळख अद्याप पटलेली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)