चिंचवड ः जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेतील प्रथम पाच क्रमांकाच्या विजेत्यांसह उपस्थित मान्यवर.

पिंपरी – पुणे जिल्हा क्रीडा परिषद व पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलांच्या गटात एम. एम. विद्यामंदिरच्या हर्षीत राजा याने अजिंक्‍यपद मिळवले. चिंचवडच्या कृष्णानगर येथील स्वामी विवेकानंद क्रीडा संकुलात ही स्पर्धा झाली. यामध्ये 90 खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये स्विसलिग पध्दतीने आठ फेऱ्या खेळविण्यात आल्या. हर्षीतने आठही फेऱ्या जिंकून आठ गुणांची कमाई केली. क्रिएटिव्ह पब्लिकच्या प्रथमेश वाघमोडे याने सात गुण मिळवत उपविजेतेपद संपादन केले. हर्षीत राजा, प्रथमेश वाघमोडे, रोहित भोकरे, तनय संत, साहील भड या पाच जणांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)