एम्समधील डॉक्टरच्या मुलाची स्वतःला गोळी झाडून आत्महत्या

पटना : बिहारमधल्या एम्स रुग्णालयातल्या एका डॉक्टरच्या मुलांना स्वतःला गोळी मारून आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. गंभीर जखमी झालेल्या डॉ. त्रिभुवन यांचा मुलगा अक्षतला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. सध्या त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून, त्यांची प्रकृती नाजूक आहे.

डॉ. त्रिभुवन हे सासाराम भागात वास्तव्याला होते. पाटणाच्या एम्स रुग्णालयात रेजिडेंट डॉक्टर असून, ते फिजिओलॉजी विभागात कार्यरत होते. तर डॉ. त्रिभुवन यांची पत्नी डॉ. निलू या स्त्रीरोगतज्ज्ञ होत्या. तसेच त्या खासगी प्रॅक्टिसही करत होत्या. डॉक्टर दाम्पत्याचा मुलगा रेडियंट शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होता. मंगळवारी रात्री तो जेवण झाल्यानंतर झोपण्यास गेला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रात्री 1 वाजता आईनं मुलाला पाणी पिताना पाहिलं होतं. त्यानंतर अक्षतनं स्वतःला गोळी मारून जीवनयात्रा संपवली. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. घटनास्थळी एक सुसाइड नोट सापडली असून, त्यात अक्षतनं हारुणनगरमधल्या फुलवारीशरीफमधील एका वादाचा उल्लेख केला होता. पोलिसांनी पिस्तूल जप्त केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)