“एम्स’च्या तोतया डॉक्‍टरला अटक

नवी दिल्ली – “ऑल इंडिया मेडिकल सायन्सेस’ अर्थात “एम्स’चा डॉक्‍टर भासवणाऱ्या एका तोतया युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. आदनान खुर्रम असे या 19 वर्षाच्या युवकाचे नाव असून गेल्या 5 महिन्यांपासून तो आपण “एम्स’मध्ये शिकाऊ डॉक्‍टर असल्याचे लोकांना भासवत होता. त्याने आपली खोटी ओळख सांगून “एम्स’च्या विविध विभाग आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये अनेक मित्रही जमवले होते. त्याने “एम्स’च्या डॉक्‍टरांसाठी आयोजित विविध कार्यक्रमांमध्येही सहभाग घेतला होता, असे “एम्स’च्या निवासी डॉक्‍टरांच्या संघटनेने सांगितले.

पोलिसांनी आज त्याला अटक केली, तेंव्हा त्याचे वैद्यकीय ज्ञान, विभागप्रमुखांची नावे आणि डॉक्‍टरांची नावे त्याला माहीत असल्याचे पाहून पोलिसही आचंबित झाले. आदनान खुर्रम याने “एम्स’च्या डॉक्‍टरांसाठीची डायरी मिळवली होती. त्याच्या आधारे त्याने ही सर्व माहिती मिळवली होती.

अटकेनंतर चौकशी दरम्यान अदनान वारंवार आपला जबाब बदलत असल्यामुळे तो तोतया डॉक्‍टर का बनला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कुटुंबातल्या एका रुग्णाच्या उपचारात प्राधान्य मिळण्यासाठी आपण हे सोंग घेतल्याचे त्याने सांगितले आहे. आपल्याला डॉक्‍टरांमध्ये वेळ घालवायला आवडत असे. आपल्यालाही डॉक्‍टर बनायचे होते, असेही त्याने सांगितले आहे. तो “एम्स’मध्ये निवासी डॉक्‍टर संघटनेचे प्रमुख हरजित सिंग यांचे काही महिन्यांपासून निरीक्षण करत असायचा. त्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवले गेले होते. आदनान नेहमी ऍप्रन आणि स्टेथोस्कोप घेऊन “एम्स’मध्ये वावरत असायचा. ज्युनिअर डॉक्‍टर, ज्युनिअर निवासी डॉक्‍टर आणि वैद्यकीय विद्यार्थी अशी वेगवेगळी ओळख तो सांगत असायचा. डॉक्‍टरांच्या व्हॉटस ऍप ग्रुपमध्येही त्याने शिरकाव केला होता.

शनिवारी डॉक्‍टरांच्या मॅरेथॉनमध्ये त्याची ओळख विचारण्यात आली आणि समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्याने त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. आदनान खुर्रम याला दक्षिण दिल्लीचे पोलिस आयुक्‍त रोमिल बनिया यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्याच्यावर तोतयेगिरी, फसवणूकीच्या हेतूने केलेली बनवाबनवी आदी आरोप ठेवण्यात आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)