एम्पायर इस्टेट उड्डाणपूल खुला होवूनही बीआरटीला “ब्रेक’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टिम अर्थात बीआरटीएस प्रकल्प हाती घेतला. सुरुवातीला मोठा गाजावाजा झाला. परंतु, मागील अडीच वर्षात बीआरटीएस प्रकल्पांकडे महापालिका प्रशासनाने पुर्णत: दुर्लक्ष झाले आहे. काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता हा बीआरटीएस मार्ग सुरू करण्यामधील प्रमुख अडथळा चिंचवड येथील एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाचा खुला होवूनही काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी बीआरटीएस मार्ग रखडला आहे.

या संदर्भात भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित गोरखे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात बीआरटीएस प्रकल्प केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय नागरी पुननिर्माण (जेएनएनयुआरएम) योजनेअंतर्गंत राबवण्यात आला. त्यावर आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. शहरात प्रमुख पाच मार्गावर बीआरटीएस बससेवा सुरू करण्याचा महापालिकेचा मानस होता. मात्र, सप्टेंबर 2015 मध्ये औंध-रावेत आणि नोव्हेंबर 2015 मध्ये नाशिका फाटा ते वाकड या मार्गावर महापालिकेने बीआरटीएस बस सेवा सुरू केली. परंतु, त्यानंतर अडीच वर्षात बीआरटीएसचे काम संथगतीने सुरू केला आहे. अडीच वर्षात एकही नवीन बीआरटी मार्ग महापालिकेला सुरू करता आलेला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सांगवी-किवळे बीआरटी मार्ग व देहू-आळंदी रस्ता या दोन रस्त्यांना जोडणारा काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता हा बीआरटीएस मार्ग शहरवासीयांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. एकूण 10.70 किलोमीटर लांबीचा हा बीआरटी मार्ग आहे. या मार्गाचे 2010 पासून वेगवेगळ्या पाच टप्प्यात काम सुरू असून हे काम जवळपास पूर्ण झालेले आहे. बस थांबे कॅरिडॉर महापालिकेने तयार केलेले आहेत. मात्र, या बीआरटीएस मार्गावरील एम्पायर इस्टेट उड्डाणपूल हा प्रमुख अडथळा होता. हा उड्डाणपूल महापालिकेने नुकताच खुला केला आहे. या मार्गावरील बीआरटीएस रस्ता सुरू झाल्यानंतर या मार्गाचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. मात्र, बीआरटीएस विभागाच्या नियोजनाअभावी हा मार्ग सुरू करण्यास विलंब होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)