एमबीए पदवीधर युवकाचा हिज्बुलमध्ये प्रवेश

भादारवाह/ जम्मू – जम्मू काश्‍मीरमधील एमबीए पदवीधर युवकाने हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेमध्ये प्रवेश केल्याचे उघड झाले आहे. या युवकाने हिंसेचा मार्ग सोडल्यास त्याला शक्‍य ती सर्व मदत करण्याची ग्वाही लष्कराच्यावतीने दिली गेली आहे.

हरून अब्बास वाणी असे या 29 वर्षीय युवकाचे नाव आहे. तो मूळचा दोडा जिल्ह्यातील घाट येथील रहिवासी असून त्याने कटरा येथील श्री माता वैष्णव देवी विद्यापिठातून “एमबीए’ची पदवी मिळवली आहे. हातात “एके-47′ रायफल घेतलेला त्याचा फोटो शनिवारी सोशल मिडीयावर व्हायरल झाला, त्यातूनच तो दहशतवादी संघटनेत सामील झाल्याचे स्पष्ट झाले.

हरूनच्या कुटुंबियांनी त्याला माघारी येण्याचे भावनिक आवाहन केले आहे. मातापित्याची सेवा करणे हाच सर्वात मोठा जिहाद आहे. आपण आनंदी असून वेगळ्या जिहादची आवश्‍यकता नाही, असे त्याच्या आत्याने व्हिडीओ संदेशात म्हटले आहे. हरून अभ्यासात हुशार होता. त्याचे दहशतवादी गटांशी कधीही संबंध नव्हते. तो जम्मूमध्ये खासगी कंपनीत नोकरी करत होता. मग त्याने हा मार्ग का निवडला, हे समजत नाही, असे त्याचे काका फारुख अहमद वाणी यांनी म्हटले आहे.

हरून गेल्या 2-3 वर्षांपासून शिक्षणासाठी कुटुंबीयांपासून दूर जम्मूमध्ये रहात होता. त्यामुळे तो कोणाच्या संपर्कात असायचा, हे नेमके सांगता येत नाही. जर हरून परत आला तर त्याला सर्वप्रकारचे सहाय्य आणि मार्गदर्शन केले जाईल, असे डेल्टा फोर्सचे जनरल कमांडिंग ऑफिसर मेजर. जनरल राजीव नंदा यांनी म्हटले आहे.

दोडामधील दुसरा युवक दहशतवादात सामील
दोडा जिल्ह्यातून दहशतवादी कारवायांमध्ये सामील झालेला हरून हा दुसरा युवक आहे. तीन महिन्यांपूर्वी 25 जुलै रोजी अबिद हुसैन भट हा लष्कर ए तोयबामध्ये सामील झाला होता. गेल्याच महिन्यात अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये तो ठार झाला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)