एमपीएससीच्या परीक्षेपुर्वी छायाचित्र बदला

..तर परीक्षेला बसता येणार नाही: दोन प्रकारची छायाचित्र जवळ ठेवा
पुणे  – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेतील बोगस विद्यार्थी घोटाळा समोर आल्यानंतर आता आयोगाकडून परीक्षेपुर्वी खबरदारी बाळगण्यात आली आहे. ओळखीच्या पुराव्यावरील छायाचित्र जुने असेल तर परीक्षेपूर्वी ते बदला अशी सूचना आयोगाने उमेदवारांना दिली आहे. छायाचित्र उमेदवाराच्या चेहेऱ्याशी जुळले नाही तर अशा उमेदवारांन परीक्षेला बसता येणार नाही असा सज्जड इशाराही आयोगाने दिला आहे.
परीक्षा देऊन अधिकारी झालेलेच उमेदवार म्हणून दुसऱ्याच्या नावे परीक्षा देत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे आयोगाने अधिक कठोर नियम केले आहेत. प्रत्येक उमेदवाराकडे आयोगाने दिलेल्या यादीपैकी दोन प्रकारची ओळखपत्रे जवळ बाळगणे आवश्‍यक आहे. त्याचप्रमाणे या ओळखपत्रावरील चेहेरा उमेदवाराच्या चेहेऱ्याशी मिळता जुळता असणे गरजेचे आहे. ओळखपत्रावरील छायाचित्र हे जुने असेल किंवा अस्पष्ट असेल तर परीक्षेपूर्वी मूळ ओळखपत्रावरील छायाचित्र बदलावे अशी सूचना आयोगाने केली आहे. मूळ ओळखपत्राबरोबरच त्याच्या छायाप्रतींमध्येही उमेदवाराचे छायाचित्र स्पष्ट असणे गरजेचे आहे. ओळखपत्रावरील छायाचित्र आणि उमेदवाराचा चेहेरा मिळता जुळता वाटला नाही तर उमेदवाराला परीक्षेला बसू दिले जाणार नाही, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे यानंतर परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान एक तास आधी उमेदवारांनी परीक्षा कक्षात हजर असणे आवश्‍यक असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)