एमजे एव्हरी संडे रॅपिड चेस चॅम्पियनशिप : वेदांत पिंपळखरेला तिसऱ्यांदा विजेतेपदाचा मान

अखेरच्या फेरीत बिस्वजीत नायकवर मात

पुणे – नाशिकच्या वेदांत पिंपळखरेने अंतिम फेरीत चुरशीच्या लढतीत बिस्वजीत नायकचा प्रगत गुणांच्या आधारे पराभव करत एमजे एव्हरी संडे रॅपिड चेस चॅम्पियनशिप स्पर्धेतील 49व्या सत्रात विजेतेपदाचा मान पटकवला. बिस्वजीत नायक विरुद्धच्या अंतिम फेरीच्या लढतीत विजय मिळविताना त्याने बिस्वजीतशी बरोबरी साधली. त्याच वेळी प्रगत गुणांच्या आधारे त्याने बिश्वजित नायकला मागे टाकताना विजेतेपदाची निश्‍चिती केली.

स्पर्धेत वेदांत पिंपळखरे हा एकमेव असा खेळाडू होता ज्याला एकदाही पराभवाला सामोरे जावे लागले नाही. तसेच या स्पर्धा मालिकेत तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्याची कामगिरी वेदांतने केली. या स्पर्धेत बिस्वजीत नायकने दुसरा (7 गुण), आदित्य सामंतने तिसरा (6.5 गुण), आकांक्षा हगवणेने चौथा (6.5 गुण), तर केवल निर्गुणने पाचवा (6 गुण) क्रमांक मिळवला.

मागील स्पर्धेप्रमाणेच या स्पर्धेत सुद्धा आदित्य सामंत व केवल निर्गुणने प्रथम पाचमध्ये येण्याचा मान मिळवला. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून रिया मराठे, तर सर्वात प्रौढ खेळाडू म्हणून आर. के. गुप्ता यांचा सन्मान करण्यात आला. या स्पर्धेत मुख्य पंच म्हणून आंतराष्ट्रीय ख्यातीचे पंच राजेंद्र शिदोरे व साहाय्यक पंच म्हणून राष्ट्रीय पंच अमित सोहोनी यांनी जबाबदारी सांभाळली. पुरस्कार वितरण सोहळा आंतराष्ट्रीय ख्यातीचे पंच राजेंद्र शिदोरे यांच्या हस्ते पार पडला.

सविस्तर निकाल-
प्रथम पाच क्रमांक
1) वेदांत पिंपळखरे – (7 गुण /31.5 प्रगत)
2) बिस्वजीत नायक – (7 गुण/31 प्रगत)
3) आदित्य सावंत – (6.5 गुण/32.5 प्रगत)
4) आकांशा हगवणे – (6.5 गुण/32 प्रगत)
5) केवल निर्गुण – (6 गुण)

8 वर्षांखालील – अद्वैत पाटील (सुवर्ण), अर्जुन राजे (रौप्य), आर्यन सिंगला (कांस्य). 10 वर्षांखालील – ओम सरोदे (सुवर्ण), अदिती कायल (रौप्य), निहार चव्हाण (कांस्य). 12 वर्षांखालील – अमित धुमाळ (सुवर्ण), अथर्व शेठ (रौप्य), यश बोडस (कांस्य). 14 वर्षांखालील – राहुल मोघे (सुवर्ण), दैवत आपटे (रौप्य), श्रवण चंद्रचूड (कांस्य), 16 वर्षांखालील – अंजनेय फाटक (सुवर्ण), वैभव बोरसे (रौप्य), संस्कृती पाटील (कांस्य).

अंतिम फेरीतील महत्त्वाचे निकाल –
वेदांत पिंपळखरे (7 गुण) वि.वि. बिस्वजीत नायक (7 गुण)
आदित्य सामंत (6.5 गुण) वि. वि. श्रेयस हापसे (6 गुण)
आकांशा हगवणे (6.5 गुण) वि.वि. हर्षल पाटील (5.5 गुण)
प्रशांत सोमवंशी (5.5 गुण) वि.वि. केतन खैरे (5.5 गुण)
केवल निर्गुण (6 गुण) वि. वि. राहुल मोघे (5 गुण).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)