एमएसएलटीए-योनेक्‍स्‌ सनराईज्‌ 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धा: ‘यांचा’ मुख्य फेरीत प्रवेश

अर्णव कोकणे, अर्णव पापरकर, सिध्दार्थ मराठे, श्रावणी खवले, श्रिवल्ली मेदिशेट्टी यांचा मुख्य फेरीत प्रवेश

औरंगाबाद: अर्णव पापरकर, केशव गोयल, सिध्दार्थ मराठे, अर्णव कोकणे, श्रावणी खवले, श्रिवल्ली मेदिशेट्टी, नियाती ककरेती, धान्वी कवड यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना एड्युरन्स्‌ मराठवाडा-एमएसएलटीए टेनिस सेंटर(इएमएमटीसी)यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए – योनेक्‍स्‌ सनराईज्‌ 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इएमएमटीसी टेनिस कोर्ट,डिव्हिजनल स्पोर्टस्‌ कॉम्पलेक्‍स्‌ येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत मुलांच्या गटात सिध्दार्थ मराठेने सुहृद किलीवोतीचा 6-0, 6-1 असा तर अर्णव कोकणेने हर्ष ठक्करचा 6-1, 6-3 असा सहज पराभव करत स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला.

केशव गोयलने सार्थक पोतदोरचा 6-1, 6-0 असा पराभव करत आगेकुच केली तर अर्णव पापरकरने सुमर ओमरचा 7-5, 3-6, 6-4 असा पराभव करत मुख्य फेरी गाठली.

मुलींच्या गटात श्रावणी खवलेने इकाराजू कनिमुरीचा 7-6(4), 6-1 असा टायब्रेकमध्ये पराभव करत स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. संघर्षपुर्ण लढतीत श्रिहीता जालीगमने सानिका भोगाडेचा 5-7, 6-0, 7-6(5) असा टायब्रेकमध्ये पराभव करत मुख्य फेरी गाठली. श्रिवल्ली मेदिशेट्टीने रिधी पोकाचा 6-2, 6-0 असा तर तनिष्का पतारने शिवानी जी हीचा 6-1, 6-0 असा सहज पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

सविस्तर निकाल : अंतिम पात्रता फेरी : मुले – केशव गोयल वि.वि सार्थक पोतदोर 6-1, 6-0, जगदिश त्रिशुल वि.वि आर्यन सुतार 6-0, 6-3, सिध्दार्थ मराठे वि.वि सुहृद किलीवोती 6-0, 6-1, अधिरीत अवल वि.वि अनमोल नागपुरे 6-0, 4-6, 6-0, वंश कर्मा वि.वि ईशान देगमवार 7-5, 6-1, कंधावेल महालिंगम वि.वि अयान तेझाबवाला 6-3, 4-6, 6-1, अर्णव कोकणे वि.वि हर्ष ठक्कर 6-1, 6-3.

मुली- श्रिवल्ली मेदिशेट्टी वि.वि रिधी पोका 6-2, 6-0, वैष्णवी वाकीती वि.वि रिया सचदेव 6-3, 0-6, 6-1, श्रिहीता जालीगम वि.वि सानिका भोगाडे 5-7, 6-0, 7-6(5), नियाती ककरेती वि.वि निराली पदानीया 6-3, 0-6, 7-5, तनिष्का पतार वि.वि शिवानी जी 6-1, 6-0
श्रावणी खवले वि.वि इकाराजू कनिमुरी 7-6(4), 6-1, सौम्या रोंडे वि.वि अनुष्का सिंग 6-3, 7-6(2), धान्वी कवड वि.वि शिरीन अहमद 6-3, 6-0.

आयुष भट, वैष्णवी अडकर यांना अव्वल मानांकन
मानांकन यादी- मुले
1. आयुष भट, 2. आयुषमान अर्जेरीया, 3. दिप मुनिम, 4. अर्जुन गोहड, 5. अजय सिंग, 6. अदित्य राठी, 7. सुखप्रित झोजे, 8. युवान नांदल
मुली- 1. वैष्णवी अडकर, 2. राधिका महाजन, 3. परी सिंग, 4. वेदा प्रापुर्णा, 5. श्रृती अहलावत, 6. ईशीता जाधव, 7. स्वेता समंता, 8. लक्ष्मी गोवडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)