एमएसएलटीए अखिल महाराष्ट्र आंतर क्‍लब टेनिस स्पर्धा उद्यापासून रंगणार

  पुणे, मुंबई, कोल्हापूर, नवी मुंबई, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, नांदेड येथील खेळाडूंचा सहभाग

पुणे – महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेतर्फे (एमएसएलटीए) पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या संलग्नतेने आयोजित करण्यात आलेली एमएसएलटीए अखिल महाराष्ट्र आंतर क्‍लब टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धा दि. 23 ते 25 मार्च 2018या कालावधीत पीवायसी हिंदू जिमखाना येथील टेनिस कोर्ट येथे रंगणार आहे. या स्पर्धेत मुंबई, पुणे, कोल्हापूर, नवी मुंबई, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, नांदेड येथील क्‍लबमधून 50 हून अधिक खेळाडू झुंजणार आहेत. राज्यस्तरीय आंतरक्‍लब स्पर्धेत सलग तीन वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या गतविजेत्या पीवायसी संघाला यावेळीही विजयासाठी पसंती देण्यात येत आहे. ही स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहे.

स्पर्धेविषयीचा 30 वर्षावरील आणि वरिष्ठ सहभागी खेळाडूंमधील स्पर्धात्मक वाढता प्रतिसाद पाहून आम्हांला अतिशय आनंद होत आहे. तसेच, राज्यभरात टेनिसच्या प्रचारासाठी आम्ही निश्‍चितच मदत करू, असे एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले. स्पर्धेतील विजेत्या संघाला 75 हजार रुपयांचे, तर उपविजेत्या संघाला 50 हजार रुयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय तिसरा कमांक पटकावणाऱ्या संघाला 25 हजार रूपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे अय्यर यांनी नमूद केले.

राज्यातील शहरांमध्ये होणाऱ्या या साखळी स्पर्धेत 1500 हून अधिक खेळाडू राज्यांतील 150 टेनिस क्‍लबचे नेतृत्व करतात. राज्य स्तरावरील अंतिम फेरीत पुणे विभागातील विजेते पीवायसी अ व उपविजेते पीवायसी क यांच्यासह मुंबई विभागातील विजेते मुंबई क्रिकेट असोसिएशन व उपविजेते सीसीआय क्‍लब आणि संयुक्त जिल्हा संघांमधील दोन संघ यांचा समावेश आहे.

या दोन जिल्हा संघाची निवड कोल्हापूर येथे पार पडलेल्या जिल्हा निवड स्पर्धेतून करण्यात आली आली होती. स्पर्धेत राज्यभरातून 6 विभागातील संघांची दोन गटांत विभागणी करण्यात येणार असून साखळी पद्धतीने सामने खेळविण्यात येणार आहेत. यातील दोन गटांतील अव्वल संघ अंतिम फेरीत झुंजणार आहेत. शरद कन्नमवार हे या स्पर्धेचे स्पर्धा संचालक आहेत.

अ गट- पीवायसी अ, सीसीआय आणि संयुक्त जिल्हा ब विभागातील संघ.
ब गट- एमसीए(मुंबई), पीवायसी क आणि संयुक्‍त जिल्हा अ विभागातील संघ.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)