एमएसएलटीएच्या सचिवपदी सुंदर अय्यर यांची फेरनिवड 

अध्यक्षपदी भरत ओझा, शरद कन्नमवार आजीव अध्यक्ष 
विश्वास लोकरे, किशोर पाटील, प्रशांत सुतार यांची उपाध्यक्षपदी, तर अभिषेक ताम्हाणे यांची कार्यकारिणी समितीच्या सदस्यस्पदी निवड 

पुणे – महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या (एमएसएलटीए) अध्यक्षपदी मुंबईचे भरत ओझा यांची, तर सचिवपदी पुण्याचे सुंदर अय्यर यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे. तसेच माजी अध्यक्ष शरद कन्नमवार यांची संघटनेच्या आजीव अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

निवडणुकीचा निकाल निवडणूक अधिकारी खुसरो श्रॉफ व निखिल संपत यांनी उच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील ऍड. मोहन खटावकर यांच्या अध्यक्षतेखाली एमएसएलटीएच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुंबई येथे जाहीर केला. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत विश्वास लोकरे, किशोर पाटील व प्रशांत सुतार या पुणेकरांसह न्या. अरविंद सावंत, प्रदीप जोशी व डॉ.दिलीप राणे हे मुंबईकर प्रचंड बहुमताने निवडून आले. नाशिकच्या राजीव देशपांडे यांची सहसचिव तर नागपूरच्या सुधीर भिवापूरकर यांची खजिनदारपदी फेरनिवड करण्यात आली.

कार्यकारिणी सभासदपदासाठीच्या निवडणुकीत अभिषेक ताम्हाणे (पुणे), शीतल भोसले (कोल्हापूर), मिलिंद देशपांडे (परभणी), शिवम मोर (यवतमाळ), अली पंजवाणी (नांदेड), राजेश बेलानी (मुंबई), वर्षा स्वामी (मुंबई) व राजीव देसाई (सोलापूर) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 2018-2022 या कालावधीसाठी ही निवड करण्यात आली. एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा म्हणाले की, संघटनेची नवीन व्यवस्थापकीय समिती महाराष्ट्रातील विविध भागातून निवडण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये टेनिसचा विकास करण्यास मदत मिळेल. तसेच नवनवीन खेळाडू तयार होऊन टेनिस खेळाला एक नवा आयाम मिळेल.

एमएसएलटीएचे मानद सचिव व एआयटीए कार्यकारिणी समिती सदस्य सुंदर अय्यर म्हणाले की, संघटना अधिकाधिक सक्षम करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. टेनिसच्या होत असलेल्या विकासाबबत आम्ही समाधानी आहोत. भारतात होत असलेल्या सर्वाधिक स्पर्धांचे यशस्वी आयोजन संघटनेने केले आहे. आपल्या खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवशाली कामगिरी केली आहे. टेनिसचा खेळ महाराष्ट्रातील छोट्यातल्या छोट्या गावापर्यंत सर्वांना परवडेल अशा पद्धतीने पोहोचेल, अशी आम्हाला खात्री आहे.

नवी व्यवस्थापकीय समिती –
आजीव अध्यक्ष- घनश्‍याम पटेल (मुंबई), शरद कन्नमवार (मुंबई), आजीव उपाध्यक्ष- आनंद तुळपुळे (पुणे), मोहन वर्दे (मुंबई), अध्यक्ष- भरत ओझा (मुंबई)
मानद सचिव- सुंदर अय्यर (पुणे), सहसचिव- राजीव देशपांडे (नाशिक), खजिनदार- सुधीर भिवापूरकर (नागपूर), उपाध्यक्ष- न्यायाधीश. अरविंद सावंत (मुंबई), प्रदीप जोशी (मुंबई), किशोर पाटील (पुणे), विश्वास लोकरे (पुणे), प्रशांत सुतार (पुणे), डॉ.दिलीप राणे (नवी मुंबई), कार्यकारिणी सभासद- अभिषेक ताम्हाणे (पुणे), शीतल भोसले (कोल्हापूर), मिलिंद देशपांडे (परभणी), शिवम मोर (यवतमाळ), अली पंजवाणी (नांदेड), राजेश बेलानी (मुंबई), वर्षा स्वामी (मुंबई), राजीव देसाई (सोलापूर).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)