“एमएसआरडीसी’च्या रिंगरोडचा विसर!

“पीएमआरडीए’ वाहतूक आराखड्यात उल्लेख नाही

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीचा “एल ऍन्ड टी’ कंपनीने “सर्वंकष वाहतूक आराखडा’ तयार केला आहे. मात्र, यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोडचा उल्लेख नसल्याची बाब समोर आली आहे.

-Ads-

“पीएमआरडीए’ने 7 हजार 200 चौरस किलोमीटर हद्दीचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्याचे काम “एल ऍन्ड टी’ला दिले आहे. कंपनीने पहिल्या टप्प्यात पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील सुमारे 2 हजार चौरस किलोमीटर लांबीचा आराखडा तयार करून सादर केला आहे. त्यामध्ये “पीएमआरडीए’चा रिंगरोड, मेट्रो, “बीआरटी’, “हायपर लूप’ आदी प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. मात्र, त्यामध्ये “एमएसआरडीसी’च्या रिंगरोडचा समावेश नसल्याची बाब उघड झाली आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी “पीएमआरडीए’सोबतच “एमएसआरडीसी’ने देखील रिंगरोडचे काम हाती घेतले आहे. हा रिंगरोड सुमारे 166 किलोमीटर लांबी आणि 110 रूंदीचा आहे.
“पीएमआरडीए’चा आणि “एमएसआरडीसी’चा रिंगरोड सुमारे 40 किलोमीटर लांबीचा रिंगरोड एकाच गावातून जात असल्यामुळे एकत्रित करण्यात आला आहे. तसेच “एमएसआरडीसी’च्या रिंगरोडला यापूर्वीच केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. असे असतानासुद्धा या आराखड्यात एमएसआरडीसीच्या रिंगरोडचा विचार करण्यात आलेला नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)