एमएनसीपेक्षा देशातील कंपन्या योग्य -लिंक्‍डइन

 व्यावसायिकांचा देशांतर्गत कंपन्यांसोबत काम करण्यावर भर

नवी दिल्ली – व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रातील रोजगारांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लिंक्‍डइन या सोशल नेटवर्किंग साईट्‌सने देशातील व्यावसायिकांकडून काम करण्यासाठी सर्वांत पसंतीच्या कंपन्यांच्या यादी जाहीर केली. 25 कंपन्यांच्या यादीमध्ये डिरेक्‍टी या भारतीय कंपनी अव्वल स्थानी आहे. या यादीमध्ये फ्लिपकार्ट, वन 97 कम्युनिकेशन्स, ओला, ओयो, मेकमायट्रिप यांचा समावेश आहे. कंपनीच्या संकेतस्थळावरील 54.6 कोटी ग्राहकांकडून हाताळण्यात आलेल्या माहितीच्या आधारे ही यादी तयार करण्यात आली.

तुलनेने बहुराष्ट्रीय कंपन्यांना म्हणजे एमएनसींना देशातील कंपन्याकडून कमी प्रतिसाद मिळतो. देशातील कंपन्यांबरोबर काम करताना आम्हाला जास्त अडीचणी येत नाहीत, असे व्यावसायिकांनी सांगितले. लिंक्‍डइनच्या अहवालानुसार भारतीयांनी गुगल आणि ऍमेझॉन यासारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करण्यापेक्षा डिरेक्‍टी, फ्लिपकार्ट, वन 97 कम्युनिकेशन्स (पेटीएम) यांनी पसंती दिली. या यादीमध्ये लिंक्‍डइन आणि त्याची पालक कंपनी मायक्रोसॉफ्टचा समावेश नाही. गेल्या दोन वर्षात सलग दुसऱ्या स्थानी असणारी अमेरिकेची ऍमेझॉन आता चौथ्या स्थानी घसरली. अव्वल तीन कंपन्यांमध्ये अनुक्रमे डिरेक्‍टी, फ्लिपकार्ट आणि वन97 कम्युनिकेशन्सचा समावेश आहे. गुगलची पालक कंपनी अल्फाबेट सातव्या स्थानी आहे. ऍप आधारित कॅब सेवा देणारी ओला ही भारतीय कंपनी पाचव्या स्थानावरून 16 व्या क्रमांकावर पोहोचली. मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज 25 कंपन्यांच्या यादीमध्ये 24 व्या स्थानी आहे.

कंपनीच्या नवीन यादीमुळे व्यवसाय क्षेत्रातील लोकांना आपल्या कामाच्या ठिकाणच्या समस्या असल्याचे मान्य करत त्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे लागणार आहे. उद्योग क्षेत्रात कर्मचाऱ्यांसाठी नव्याने नियम तयार करण्यात येतील, असे लिंक्‍डइनचे इंडिया एडिटर आदित्य चार्ली यांनी म्हटले. चीनच्या तुलनेत भारताने उत्पादन क्षेत्रात समान रोजगार उपलब्ध करणे आवश्‍यक आहे. अन्यथा उत्पादन क्षेत्रातील रोजगाराअभावी विकासाला खीळ बसेल असे नोबेल पुरस्कार विजेते पॉल प्रृगमॅन यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)