एमएड सीईटीचे वेळापत्रक जाहीर  

 

प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने एमएड अभ्यासक्रमाचे सीईटीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार या सीईटीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास आजपासून सुरुवात झाली असून, त्याची शेवटची मुदत 7 मे पर्यंत आहे. एमएड सीईटी 15 जून रोजी होणार असून, त्याचा निकाल 30 जून रोजी होणार आहे.

एमएड अभ्यासक्रम सीईटीसाठी दि 26 मार्च ते 7 मे या कालावधीत अर्ज करता येईल. त्याच कालावधीत अर्ज निश्‍चिती होईल. खुल्या वर्गासाठी 1 हजार, तर मागासवर्गीय संवर्गासाठी 500 रुपये शुल्क राहणार आहे. या सीईटीची हॉल तिकीट दि. 23 मे नंतर संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना त्यांच्या लागईनमधून डाऊनलोड करता येईल, असे परीक्षा कक्षाचे आयुक्‍त आनंद रायते यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)