‘एमएचटी-सीईटी’ नोंदणीसाठी लिंक सुरू

पुणे – राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी घेण्यात येणारी “एमएचटी-सीईटी’ परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन अर्थात नोंदणी करण्यासाठी लिंक उद्यापासून (दि. 1) सुरुवात होणार आहे, असे राज्य सीईटी सेलने संकेतस्थळाद्वारे प्रसिद्ध केले आहे. “एमएचटी-सीईटी’ यंदापासून ऑनलाईन होणार आहे.

राज्य सीईटी सेलने नुकतेच सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. याबाबतचे परिपत्रकही जाहीर झाले. अभियांत्रिकी, कृषी आणि अभियांत्रिकी या तीनही अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी “एमएचटी-सीईटी’ परीक्षा घेतली जाते. दरवर्षी ही परीक्षा ऑफलाईनद्वारे होत होती. यावर्षी ही परीक्षा ऑनलाईनद्वारे पहिल्यांदाच घेण्यात येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“एमएचटी-सीईटी’ यावर्षी 2 मे ते 13 मे या कालावधीत घेण्यात येणार असल्याचे राज्य सीईटी सेलने प्रसिद्ध केलेल्या संभाव्य वेळापत्रकात नमूद आहे. या परीक्षेसाठी प्रथमत: राज्य सीईटी सेलच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्यात प्राथमिक माहिती भरावयाचे आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रत्यक्ष प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना “एमएचटी-सीईटी’ परीक्षेला बसता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

“एमएचटी-सीईटी’सह बॅचरल ऑफ फाईन आर्ट या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी असणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी नोंदणीस दि. 1 जानेवारीपासून सुरू होणार आहे. एमएएच-एएसी-सीईटी 2019 असे या सीईटीचे नाव आहे. दरम्यान, दोन्ही अभ्यासक्रमाच्या सीईटीस नोंदणीस सुरुवात झाली आहे. मात्र, त्याचे सविस्तर कालावधी लवकरच जाहीर होण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)