‘एमएचटी-सीईटी’साठी सव्वाचार लाख अर्ज दाखल

अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च

पुणे- इंजिनिअरिंग, फार्मसी आणि अॅग्रिकल्चर अभ्यासक्रमाच्या पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात ‘एमएचटी-सीईटी’साठी आतापर्यंत 4 लाख 28 हजार 730 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. विलंब शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्चपर्यत आहे. त्यामुळे सीईटीसाठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने “एमएचटी-सीईटी’चे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार सीईटीसाठी अर्ज करण्याचा कालावधी 18 जानेवारी ते 25 मार्चपर्यंत होती. त्यानंतर विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत दि. 26 ते 31 मार्चपर्यंत आहे. ही सीईटी 10 मे रोजी होणार आहे. आतापर्यंत एमएचटी-सीईटीसाठी सव्वा चार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत, अशी माहिती पुणे विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. डी. आर. नंदनवार यांनी दिली.

इंजिनिअरिंग, फार्मसी आणि अॅग्रिकल्चर या तीन अभ्यासक्रमांसाठी मिळून ही अर्जाची संख्या आहे. गेल्या वर्षी अभियांत्रिकी आणि फार्मसीचे मिळून प्रवेश क्षमता दीड लाख इतकी होती. यावर्षी पहिल्यादांच कृषी अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेशप्रक्रिया एमएचटी-सीईटीमार्फत होत आहे. त्यामुळे अर्जाची संख्या वाढली आहे. प्रत्येक किती विद्यार्थी कोणत्या अभ्यासक्रमासाठी अर्ज केले आहेत, ती माहिती यथावकाश जाहीर केले जाणार आहे, असेही नंदनवार यांनी नमूद केले.

दरम्यान, बारावी परीक्षा संपण्यापूर्वी एमएचटी-सीईटीसाठी अर्जाची संख्या तीन लाख इतकी होती. परीक्षा संपल्यानंतर मात्र अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. नियमत शुल्कासह अर्ज करण्याची मुदत संपली आहे. विलंब शुल्कासह अर्ज करण्यासाठी आणखी चार दिवस राहिले आहेत, असेही तंत्रशिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

पुणे विभागातून सीईटीसाठी एक लाख अर्ज
शहर          अर्जाची संख्या
पुणे             46,540
नगर           25,322
सोलापूर       17,468
सातारा       13,635
—————-
एकूण    1,02,965


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)