“एमएचटी-सीईटी’चे “व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’व्दारे मार्गदर्शन

ताथवडे – जेएसपीएम संस्थेच्या ताथवडे येथील राजर्षी शाहु अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे 21 एप्रिल रोजी “एमएचटी-सीईटी’ परीक्षेबाबत “व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’व्दारे मार्गदर्शन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दरवर्षी महाराष्ट्र शासन अभियांत्रिकी आणि फार्मसी शाखेत प्रवेश घ्येण्यासाठी “एमएचटी-सीईटी’ ही सामायिक परीक्षा घेत असते. अभियांत्रिकी आणि फार्मसी प्रवेशासाठी या परीक्षेतील गुण महत्वाचे असतात. त्यामुळे ही परीक्षा अभियांत्रिकी आणि फार्मसी या विद्या शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे.

-Ads-

या वर्षी महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांच्या शंका दूर करण्यासाठी तसेच परीक्षेसंबंधी माहिती देण्यासाठी शासकीय अधिकारी “व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती प्राचार्य डॉ. आर. के. जैन यांनी दिली. संस्थेचे संस्थापक सचिव तथा आमदार डॉ. तानाजी सावंत, ताथवडे संकुलाचे कार्यकारी संचालक प्रा. सुधीर भिलारे, संकुल उपप्रमुख रवी सावंत, प्रा. ए. एस. देवस्थळी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)