मुंबई : दुबईमधील एमआर (ईएमएएआर) ग्रुप ही कंपनी राज्यातील कृषी प्रक्रिया व शेतमाल निर्यात क्षेत्रात गुंतवणूक करण्यास इच्छुक असून यासंदर्भात ग्रुपच्या शिष्टमंडळाने आज कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांची भेट घेऊन चर्चा केली.

एमआर ग्रुप ही दुबईमधील कंपनी असून राज्यातील कांदा साठवणूक व प्रक्रिया, टोमॅटो, द्राक्ष, डाळिंब व भाजीपाला प्रक्रिया व निर्यात, पोल्ट्री उत्पादन, शेळी, मेंढी मांस प्रक्रिया आदींचे प्रक्रिया व निर्यातीसाठी गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. तसेच शेतकरी उत्पादक गटांबरोबर सहकार्य करून त्यांची उत्पादने विकत घेणार आहे. आज झालेल्या चर्चेत कंपनीच्या प्रकल्पासाठी जागा, गुंतवणूक तसेच कोणकोणत्या भागातील उत्पादने घेणार यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)