एमआरपीपेक्षा जास्त किंमत घेणाऱ्या दुकानदारांवर होणार कठोर कारवाई

नवी दिल्ली : एमआरपीपेक्षा जास्त किंमत ग्राहकांकडून घेणाऱ्या दुकानदारांविरोधात सरकार आणखी कठोर पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भातील तक्रारींची संख्या वाढत असल्याने नुकतीच एक बैठक घेण्यात आली. असे करणाऱ्याच्या शिक्षेचा कालावधी वाढवण्याबाबत या बैठकीत विचार करण्यात आला. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने हा प्रस्ताव स्वीकारल्यास एमआरपीपेक्षा अधिक किंमत आकारणा-यांना पाच लाख रुपये दंड आणि २ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागू  शकते.

ग्राहक मंत्रालयाकडे प्रत्येक राज्यातून दुकानदारांविरोधात तक्रारी येत असतात. एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, १ जुलै २०१७ ते २२ मार्च २०१८ पर्यंत ६३६ पेक्षा जास्त तक्रारी मिळालया आहेत. अशात मंत्रालयाने नियम आणखी कठोर करण्याचा विचार केलाय. हे प्रस्ताव लागू कारण्यासाठी लीगल मेट्रोलॉजी ऍक्ट मध्ये संशोधन करावे लागेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)