एमआरआय करताना ‘काय’ घ्यावी विशेष काळजी?

डॉ. अविनाश भोंडवे

एम.आर.आय.यंत्रप्रणालीमध्ये प्रचंड शक्तीचे विद्युतप्रवाहातून निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र वापरले जात असल्याने हे वापरताना कमालीची काळजी घ्यावी लागते. या चुंबकीय क्षेत्रात कोणतीही लोखंडाची किंवा लोह अंश असलेली वस्तू येऊन चालत नाही. अशी गोष्ट आल्यास ती वेगाने चुंबकाकडे खेचली जाऊन त्या व्यक्तीच्या जीवाला धोका होऊ शकतो. यासाठी खालील काळजी घ्यावी असे आंतरराष्ट्रीय स्तरावरील रेडिऑलॉजिस्टच्या संस्थांनी काही विशेष सूचना फार पूर्वीपासूनच दिलेल्या आहेत.  

एमआरआयच्या खोलीत खिळे, स्क्रू ड्रायव्हर किंवा तत्सम लोखंडी अवजारे ठेवलेली चालत नाहीत.


एमआरआयच्या खोलीत वावरणाऱ्या व्यक्तींच्या, डॉक्‍टरांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या खिशात, हातात किंवा शरीरावर कोणतीही लोखंडी वस्तू नसावी. खालील गोष्टी असल्यास त्या तपासणीच्या खोलीत येण्यापूर्वी कटाक्षाने दूर कराव्यात.


पर्स, पैशाचे पाकीट, नोटांना लावलेल्या क्‍लिप्स, पिना, क्रेडिट कार्डस्‌, डेबिट कार्डस्‌ आणि अन्य कार्डस्‌ ज्यांना मेटालिक क्‍लिप्स वापरल्या जातात.


मोबाइल, कॅल्क्‍युलेटर अशी इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे


हिअरिंग धातू असलेले दागिने, घड्याळे


पेन, टाचण्या, सुया, पेपर क्‍लिप्स, केसांच्या पिना, सेफ्टी पिना


चपला, बूट, कंबरेचे पट्टे आणि त्यांची बक्कल्स,


धातूची झिप, धातूची बटणे, हूक्‍स, धातूचा अंश असलेले जरीबुट्टीचे कपडे तसेच अंतर्वस्त्रे


रुग्णाच्या किंवा कर्मचारी अथवा डॉक्‍टरांच्या अंगावरील वस्त्रात, कपड्यावर लोखंडाचा अंश असलेली जरीबुट्टी देखील नसावी.


एमआरआयच्या खोलीत आणल्या जाणाऱ्या रुग्णासोबत ऑक्‍सिजन सिलिंडर, सलाईनची सुई अशा लोखंडी गोष्टी नसाव्यात.


पाठीच्या कण्यात बसवलेले धातूचे मणके किंवा पट्ट्या


सांध्याच्या किंवा हाडांच्या शस्त्रक्रियांमध्ये जर धातूच्या प्लेटस्‌, पिन्स, स्क्रू, धातूची जाळी वापरली गेली असल्यास


सांध्यांचे प्रत्यारोपण करताना वापरले जाणारे कृत्रिम सांधे, प्रोस्थेसिस


बॉडी पिअर्सिंग किंवा बॉडी मॉडिफिकेशनसाठी धातूच्या गोष्टी वापरल्या गेल्या असल्यास


मेकअप, नेलपॉलिश किंवा अन्य सौंदर्य प्रसाधने ज्यात लोहाचा अथवा धातूचा अंश आहे.


काही टॅटूज किंवा टॅटूने सजवलेल्या आयलायनर्स यामुळे एमआरआयमधील प्रतिमा बिघडतात. तसेच शरीराच्या त्या भागात रुग्णाला कमालीचा दाह होतो.


दातांच्या फिलिंगमध्ये वापरलेल्या धातूचा रुग्णाला त्रास होत नाही, मात्र त्यामुळेसुद्धा एमआरआयच्या प्रतिमा विकृत येऊ शकतात.


कोणतेही अत्याधुनिक यंत्र वापरणाऱ्या व्यक्तींना ते वापरण्यासाठी जे कौशल्य लागते, त्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये ती यंत्रे वापरताना घ्यावयाच्या विशेष काळजीबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. एमआरआय अशाच प्रकारचे अत्याधुनिक वैद्यकीय यंत्र आहे त्यामुळे ते वापरण्याबाबतदेखील अशीच विशेष काळजी डोळ्यात तेल घालून घ्यावी लागते. अन्यथा नायर रुग्णालयासारखे प्रसंग पुन्हा घडू शकतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)