एमआयडीसी परिसरात घरफोडी करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

नगर – एमआयडीसी परिसरातील विखे पाटील हॉस्पीटलजवळील घरात प्रवेश करून मंगळसुत्र व मोबाईल चोरी करणाऱ्या चोरटयास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी कि दि. 12 डिसेंबर 2017 रोजी एमआयडीसी परिसरातील विखे पाटील हॉस्पीटल जवळ राहणारे फिर्यादी दिनेश भास्कर काळे यांच्या घरात अज्ञात चोरटयाने प्रवेश करून मोबाईल व मंगळसुत्र असा 22 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
गुप्त बातमीदारांमार्फत एक संशयित आरोपी वडगाव बायपास रस्त्यावर येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळताच त्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस अधिक्षक घनशाम पाटील, ग्रामीण विभागाचे अपर पोलीस अधिक्षक मनीष कलवानीया यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाटील, पोलीस हेड कॉन्सटेबल बाळासाहेब मुळीक, योगेश गोसावी ,अण्णा पवार , रवी कर्डीले, दिपक शिंदे, रवीकिरण सोनटक्के, बाळासाहेब भोपळे, आदींनी एमआयडीसी परिसरातील वडगाव गुप्ता बायपास रस्त्यावर सापळा रचून मोठया शिताफिने या संशयितास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता पप्पु परसराम काळे(रा.वडगाव गुप्ता,ता.जि.अ.नगर) असे त्याने नांव सांगुन 12 डिसेंबर 2017 रोजी केलेल्या गुन्हयांची कबूली पोलीसांना दिली.त्याच्या कडून गुन्हयांतील मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला असून त्याला पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. या आरोपीकडून आणखीही घरफोडीचे गुन्हे उघडकिस येण्याची शक्‍यता पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)