एमआयडीसीच्या समस्येने निंबळक ग्रामस्थ आक्रमक

रासायनिक पदार्थ, सांडपाण्याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्याची मागणी

नगर- एमआयडीसी येथील गॅस कंपनी ते निंबळक दरम्यान दोन्ही बाजूने पथदिवे बसवावे, रस्त्यावर चौका-चौकात गतिरोधक उभारावे, कंपनीतील घातक रासायनिक पदार्थांच्या विल्हेवाटसाठी कचरा डेपो उभारावा व रसायनयुक्त पाणी जलस्रोतामध्ये न सोडता त्याची योग्य व्यवस्था करण्याची मागणी निंबळक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन एमआयडीसी विद्युत विभाग तथा पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख एन. जी. राठोड व घनकचरा व्यवस्थापन तथा रस्ते विभागाचे डी. एल. वाघ यांना देण्यात आले.

-Ads-

यावेळी माजी सरपंच विलास लामखडे, सुभाष कोरडे, बाबासाहेब पगारे, राजू रोकडे, सतीश गवळी, अशोक शिंदे, सुभाष शिंदे, विलास होळकर आदी उपस्थित होते. एमआयडीसीत पुरेश्‍या प्रमाणात पथदिव्यांची व्यवस्था नसल्याने रात्री कामगारांना लुटण्याचे प्रकार घडत आहे. तर या रस्त्यांवर गतिरोधक नसल्याने अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे. एमआयडीसीला लागून मोठी नागरी वस्ती असून, कंपनीत घातक रासायनिक पदार्थ जाळण्यात येत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर या पदार्थांच्या विल्हेवाटाची व्यवस्था नसल्याने ते बाहेर उघड्यावर टाकले जात आहे. तरी एमआयडीसीने नागापूर वसाहतमध्ये एक भूखंड विकसीत करुन येथे या रासायनिक टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करावी. तर एमआयडीसीतून निघणारे रासायनिकयुक्त सांडपाणी तलावात सोडले जात आहे. त्याचा दुष्परिणाम परिसरातील जनावरांवर होत असून, अनेक जनावरे अनेक आजार होऊन दगावली आहेत. यासाठी तातडीने गॅस कंपनी ते निंबळक दरम्यान दोन्ही बाजूने पथदिवे बसवावे, रस्त्यावर चौका-चौकात गतिरोधक उभारावे व रसायनयुक्त पाणी जलस्रोतामध्ये न सोडता त्याची योग्य व्यवस्था करण्याची मागणी निंबळक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. या मागणीचा गंभीरपूर्वक विचार न केल्यास दि. 5 फेब्रुवारी रोजी एमआयडीसी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)