एमआयटीतर्फे कारि-कला प्रदर्शनाचे आयोजन

लोणी काळभोर – येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्‍नॉलॉजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ फाईन आर्ट आणि अप्लाईड आर्ट या शाखेतर्फे बालगंधर्व रंगमंदिरातील कला दालनात एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील राय यांच्या मार्गदर्शनाखाली “कारि’ या दोन दिवसीय कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 26 ते 28 नोव्हेंबर दरम्यान भरविण्यात आलेल्या कला प्रदर्शनाचे उद्‌घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय उपाध्ये यांच्या हस्ते झाले. यावेळी एमआटी एडीटी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालिका प्रा. ज्योती ढाकणे, स्कूल ऑफ फाईन आर्ट आणि अप्लाईड आर्टचे प्राचार्य डॉ. मिलिंद ढोबळे आदी उपस्थित होते. या ठिकाणी फाईन आर्ट या पदवीत्तर अभ्यासक्रमाच्या चित्रकला आणि शिल्पकला विभागाच्या विद्यार्थ्यांनी रेखाटलेले चित्र आणि शिल्पकृती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. यावेळी विद्यार्थिनी तन्वी पुजारी हिने सूत्रसंचालन केले, तर रिया गावकर हिने आभार प्रदर्शन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)