एमआयएमचा “त्या’ नगरसेवकाला एका वर्षाची कोठडी

औरंगाबाद – माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यास विरोध करणारा एमआयएमचा नगरसेवक सय्यद मतीन याला एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वाढती गुन्हेगारी व धोकादायक कारवायांची गंभीर दखल घेऊन औरंगाबाद पोलिसांनी महाराष्ट्र धोकादायक कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए 1981) मतीन याच्यावर कारवाई केली आहे. मतीन याची एका वर्षासाठी हर्सुल येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.

बेकायदेशीर जमाव जमविणे, जाळपोळ करून नुकसान करणे, मनुष्यहानी होईल असे धोकादायक कृत्य करणे, जाणीवपूर्वक नुकसान पोहोचविणे, लोकसेवकांवर हल्ला करणे, आदेशाचे उल्लंघन करणे, सरकारी कामात अडथळा असे विविध गुन्हे दाखल त्याच्यावर दाखल आहेत.

दरम्यान, शुक्रवारी औरंगाबाद महापालिकेत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावावरून भाजपा आणि एमआयएम नगरसेकांमाध्ये हाणामारी झाली होती. त्यावेळी मतिनने श्रद्धांजली प्रस्तावास विरोध दर्शवला होता. यामुळे संतप्त होत सभागृहातील भाजपा नगरसेवकांनी त्याला मारहाण केली. त्यानंतर बाहेर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी भाजपा नेत्यांवर हल्ला केला होता. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)