नवी दिल्ली : धडाकेबाज फलंदाज एबी डी’व्हिलियर्स काही मिनिटांपूर्वीच क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेत क्रिकेट जगताला मोठा धक्का दिला. पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकापूर्वी डी’व्हिलियर्सने हा निर्णय घेतल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघालाही हा मोठा धक्का असेल. डी’व्हिलियर्सने ट्विटरच्या माध्यमातून ही गोष्ट साऱ्यांना सांगितली आहे. ट्विटरवर डी’व्हिलियर्सने एक व्हीडीओ पोस्ट केला आणि त्यामध्ये त्याने आपण क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेत असल्याचे त्याने जाहीर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)