वॉशिंग्टन: लॉकहिड मार्टिन कंपनीद्वारा एफ-16 ही लढाऊ विमाने तयार केली जातात. आता या विमानाच्या पंखाचा भाग टाटा समूहाच्या टाटा ऍडव्हॉन्स्ड सिस्टिमकडून तयार होणार आहेत. या दोन्ही कंपन्यादरम्यान तसा करार झाला आहे.
लॉकहिडने असेही स्पष्ट केले आहे की, हा पंख बनविण्याचा व्यवहार स्वतंत्र स्वरूपाचा आहे. या कंपनीने या विमानाचे पूर्ण उत्पादनच भारतात करू देण्याचा प्रस्ताव भारत सरकारकडे दिला आहे. मात्र, भारत सरकारने त्यावर आतापर्यंत तरी निर्णय घेतलेला नाही. त्या प्रस्तावाचा आणि टाटा समूहाबरोबर झालेल्या आताच्या व्यवहाराचा सबंध नसल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)