एफआरपीसाठी स्वाभिमानी आक्रमक

दोन महिने उलटून ही बिले नाहीत: आजपासून टाळे ठोको आंदोलन

सातारा,दि.9 (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील साखर कारखाने सुरु होऊन दोन महीने पूर्ण झाले मात्र, अद्याप साखर कारखान्यानी शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे बिले अदा केली नाहीत त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. एफआरपी न देणाऱ्या साखर काराखंदारावर त्वरित फौजदारी गुन्हे दाखल करा अन्यथा उद्या (गुरूवार) पासून गट ऑफीसला व नंतर काखान्यांना टाळे ठोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने बुधवारी उपजिल्ह्याधिकारी सचिन बारावकर यांना लेखी निवेदन सादर करून आपल्या मागण्या मांडल्या. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे, कोअर कमिटीचे अध्यक्ष अलीभाई ईनामदार, युवा आघाडीचे जिल्ह्याध्यक्ष धनंजय महामूलकर, शिवाजी पाटिल, मनोज जाधव, विक्रम थोरात, मनोज ढाणे, संजय साबळे, जीवन शिर्के, बी.जी. साबळे, अनिल बाबर, दादा यादव आदी.पदाधिकारी उपस्थित होते
दोन महिन्यापूर्वी जिल्ह्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील साखर कारखाने व शेतकरी संघटना प्रतिनिधी यांची बैठक झाली. त्यावेळी चालू गळीत हंगामातील ऊसाचा एफआरपी अधिक दोनशे रुपये दर देण्याचा व मागील हंगामातील थकित देणे एक महिन्याच्या आत अदा करण्याचे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले होते. तसेच एक महिन्यात बिले न दिल्यास साखर कारखानदारावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी उपस्थित पोलीस प्रमुखांना दिले होते. परंतु आज दोन महीने पूर्ण होऊन ही शेतकऱ्यांना ऊस बिले मिळाली नाहीत. ऊस दर नियंत्रण क़ायदा 1966 चे कलम 3( 3अ) नुसार शेतकऱ्यांना ऊस गाळप झाल्यापासुन चौदा दिवसात पूर्ण झाल्या नंतर एक रकमी एफआरपी ची रक्कम देणे कारखान्यांना देणे बंधनकारक असताना आज काही कारखान्यांनी एफआरपी ची मोडतोड़ केली आहे तसेच काहींनी पूर्ण रक्कम थकित ठेवली आहे त्यामुळे संबधित कारखानदारांवर गुन्हे दाखल करा अन्यथा उद्या तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे नलवडे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)